पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

By नितीन चौधरी | Updated: September 13, 2024 19:01 IST2024-09-13T19:00:42+5:302024-09-13T19:01:31+5:30

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभाही होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले

Prime Minister Narendra Modi on Pune visit Inauguration of Shivajinagar to Swargate metro line on 27th September | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

पुणे: शिवाजीनगर-स्वारगेट मार्गाच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले असून स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मान्यता मिळाली आहे. भूमिगत मार्गाचे आणि नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन आहे. शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभाही होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मोदी यांच्या पुण्याच्या २७ सप्टेंबरच्या दौऱ्याबाबत मुख्य सचिवांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली होती. त्यात दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. दौरा अंतिम झाल्यानंतर आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi on Pune visit Inauguration of Shivajinagar to Swargate metro line on 27th September