भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडल्याप्रकरणी १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १८ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 12:09 AM2020-09-02T00:09:59+5:302020-09-02T00:18:01+5:30

मागण्या मान्य करत नसलेल्या शासनाचा निषेध करत जलवाहिनीवर बसून आंदोलकांनी काम बंद पाडले...

Preventive action against 133 persons for stopping work of Bhama Askhed navy; Crime against 18 persons | भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडल्याप्रकरणी १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १८ जणांवर गुन्हा

भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडल्याप्रकरणी १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १८ जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देबेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी ११५ जणांना शांततेचा भंग व त्याबाबत समज आणि ताकीद देऊन सोडून देण्यात आले.

आसखेड: भामा आसखेड धरणावरून पुण्याला नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम धरणग्रस्तांनी सोमवारी( दि.३१ ) बंद पाडल्याने सायंकाळी सुमारे १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली. पैकी १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर ११५ जणांना शांततेचा भंग व त्याबाबत समज आणि ताकीद देऊन सोडून देण्यात आले , अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

   भामा आसखेड धरणामधून पुण्याला देण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम (दि.१४ ऑगस्ट ) पोलीस बंदोबस्तात सुरू केले होते. परंतु, विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांचे कित्येक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करत नसलेल्या शासनाचा निषेध करत जलवाहिनीचे पाईपलाईनवर बसून आंदोलकांनी काम बंद पाडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. याप्रकरणी २७ जणांवर कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरणातून पुणे शहराकडे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन केली जात आहे. त्याचे काम सुरु आहे. खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे या पाइपलाइनचे काम सुरु आहे. कामाच्या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी केली.  आणि गबाजी सातपुते या वृद्धास गाडीच्या दरवाज्याच्या बाजूला हेतुपूर्वक ढकलून देऊन मारण्याच्या प्रयत्न आंदोलकांनीच केला अश्या आरोपाने तसेच तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस शिपाई के .यू .कराड आणि सहाय्यक फौजदार एस .आर .वाघुले यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

यामध्ये पोलीस कर्मचारी कराड यांच्या गणवेशाची बटणे तुटली. तर सहाय्यक फौजदार वाघुले यांच्या हाताला व पायाला मार लागला. आंदोलकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी १८  जणांना अटक केली आहे. १८ पैकी ९ जणांची जामिनावर सुटका करण्यात आली.  तर अजय नवले(रा. वाहागाव ता. खेड), शिवाजी राजगनरव(रा. आखतुली ता. खेड) ,रामदास होले(रा. कासारी ता. खेड), सुनील भालशिंग(रा. कोळीये ता. खेड), दत्तू शिवेकर(रा. शिवे ता. खेड), अरुण कुदळे(रा. देवतोरने ता. खेड), नवनाथ शिवेकर (रा. शिवे ता. खेड), तान्हाजी डांगले (रा. पराळे ता. खेड), गणेश जाधव (रा. गावरवाडी ता. खेड) आदी९ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस ठाण्याने दिली. चाकणचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश राठोड पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Preventive action against 133 persons for stopping work of Bhama Askhed navy; Crime against 18 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.