शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून आर्थिक हातभार लावताना खातरजमा करा : धर्मादाय आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:36 PM

जनतेकडून सामाजिक बांधिलकीपोटी जमा केलेली रक्कम योग्य त्या अधिकृत ठिकाणी पोहचणे आवश्यक मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन 

ठळक मुद्देमुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहनतरतूदीचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था फौजदारी कारवाईस पात्र

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून आर्थिक मदत करत असताना वर्गणी दरांनी वर्गणी जमा करणारा व्यक्ती,एखादी संस्था किंवा व्यक्तीसमुह कायदेशीरपणे वर्गणी जमा करत असल्याची खातरजमा करावी,असे आवाहन धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगातील इतर देशांप्रमाणे देशात वा महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक आरोग्य विषयक उपाययोजना केल्या आहे.तरीदेखील प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेस मदत म्हणून पंतप्रधान सहय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक संस्था व विश्वस्त मंडळांनी मोठी मदत केली,या सर्वांचे अभिनंदनच केले पाहिजे.महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 च्या कलम 41 सी मध्ये विहित केलेल्या तरतुदीचा अवलंब केल्याशिवाय जनतेकडून वर्गणी जमा करता येत नाही.तसेच या तरतूदीचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था फौजदारी कारवाईस पात्र असते.         जनतेकडून सामाजिक बांधिलकीपोटी जमा केलेली रक्कम योग्य त्या अधिकृत ठिकाणी पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा फौलावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या उद्देशासाठी ही रक्कम वापरली जाईल.त्यासाठी धनादेशाद्वारे मदत स्वीकारली जाते.तसेच ऑनलाईन पध्दतीने क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड द्वारे सुध्दा ऑनलाईन मदत जमा करता येते. राज्यातील जनतेने सढळ हाताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत जमा करावी,असे आवाहन धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

---------मदत जमा करण्यासाठी कलम 41 सी (2)  नुसार परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.तसेच जमा केलेल्या वर्गणीचा हिशोब देणे बंधनकारक आहे. हिशोब दिल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांना नंतरही परवानगी दिली जाते.परंतु,हिशोब न दिल्यास अथवा जमा वर्गणीचा गैरवापर केल्यास फसवणुकीचा फौजदारी  गुन्हा हाऊ शकतो,असे धर्मदाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfraudधोकेबाजीfundsनिधीonlineऑनलाइन