'तू खीच मेरी फोटो', पुणे मेट्रोमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट; जोडपे - फोटोग्राफरवर प्रशासनाची दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:25 IST2025-11-12T16:24:28+5:302025-11-12T16:25:32+5:30
मेट्रो प्रशासनाने वारंवार थांबवण्याचा इशारा देऊनही त्यांनी शूट सुरूच ठेवल्याने अखेर जोडपे आणि फोटाग्राफरवर कारवाई करण्यात आली

'तू खीच मेरी फोटो', पुणे मेट्रोमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट; जोडपे - फोटोग्राफरवर प्रशासनाची दंडात्मक कारवाई
पुणे: पुणेमेट्रो हे प्रवाशांचे एक वेगळेच आकर्षण ठरले आहे. मध्यवर्ती भागातील भुयारी मेट्रो सुरु झाल्याने नागरिकांना खूप फायदा झाला आहे. बाजारपेठेत जाण्यासाठी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोचा वापर सर्वाधिक होताना दिसत आहे. याच मेट्रोने प्रवासात सेल्फी, फोटो काढण्याचा मोह नागरिकांना आवरता येत नाही. अनेक जण प्रवास करताना फोटो, सेल्फी काढण्याचा आनंद घेत असतात. पण अशातच नवे प्रकरण समोर आले आहे.
भुयारी मेट्रोमध्ये मंडई स्थानकाजवळ प्री-वेडिंग फोटोशूट करणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. परवानगी न घेता मेट्रोच्या परिसरात फोटोशूट केल्याने पुणे मेट्रोकडून संबंधित जोडपे आणि फोटोग्राफरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या विविध स्टेशन आणि मेट्रो ट्रेनमध्ये हे फोटोशूट करण्यात आले होते. मेट्रो प्रशासनाने वारंवार थांबवण्याचा इशारा देऊनही त्यांनी शूट सुरूच ठेवल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली. मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने असे अनधिकृत फोटोशूट न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या शूटसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.