शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:49 PM

लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रवीण गायकवाड काँगेसच्या तिकीटावर पुण्यात निवडणुक लढण्यास इच्छुक आहे.

ठळक मुद्देटिळक भवनमधे काँग्रेसची बैठक सुरु , राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह मुंबईत दाखल

पुणे : लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रवीण गायकवाड काँगेसच्या तिकीटावर पुण्यात निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

काँग्रेसच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला रावेरची जागा सोडण्यात आली होती. त्याठिकाणी पक्षाचा उमेदवार म्हणून उल्हास पाटील यांची घोषणा केली . मात्र , पुण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून तो संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असे म्हणत या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवला.  गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु आहे. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून देखील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. काल तर लोककलावंत सुरेखा पुणेकरांचे नावही देखील चर्चेत आले होते. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि पुण्यात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा पुढे आले . लोकसभेच्या उमेदवारीचा मनसुबा ठेवत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

मागील काही दिवसांपासून पुण्यातील उमेदवारीबाबत दिल्ली दरबारी चर्चा सुरू आहे. सुरूवातीला गायकवाड यांनी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करून दिल्लीवारीही केली. पण विरोध झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. मोहन जोशी, शिंदे यांचीच नावे स्पर्धेत असल्याचे चित्र निर्माण झाले. बुधवारी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली. पण दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा गायकवाड यांचे नाव स्पर्धेत आल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये येऊन शहराध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतली. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

त्यानंतर लोकमत शी बोलताना गायकवाड म्हणाले, मी काँग्रेससोबत काम करायचे ठरविले आहे. लोकसभेचे तिकीट हा माझ्यादृष्टीने महत्वाची विषय नव्हता आणि नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील माझ्या पाठीराख्यांना वाटते की, आपल्या माणसाला तिकीट मिळालाय हवे. ते मिळाले तर त्याचा फायदा राज्यभरात होईल. नेतेमंडळी काही कारणांमुळे बाहेर असल्याने पक्ष प्रवेशाची प्रक्रिया लांबली होती. आता शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, सोनल पटेल, इतर नेत्यांच्या उपस्थितीत प्राथमिक सदस्यत्व व पक्ष प्रवेश करण्याचे नियोजन आहे. 

टॅग्स :Puneपुणेpravin gaikwadप्रवीण गायकवाडcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक