Join us  

NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 3:59 PM

एनएसईनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 9000 टक्के अंतिम लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. एनएसईच्या संचालक मंडळाने शुक्रवारी प्रति शेअर 4 बोनस शेअर्स ची घोषणा केली आहे. याशिवाय प्रति शेअर 90 रुपयांचा लाभांशही जाहीर करण्यात आला. हा मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरच्या फेस व्हॅल्यूवर 9000% चा अंतिम डिविडंड आहे आहे. 

आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीनंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे. पात्र भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेपासून 30 दिवसांच्या आत पैसे दिले जातील. एनएसईनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 9000 टक्के अंतिम लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे. प्रति शेअर 90 रुपयांचा डिविडंड दिला जाईल.  

तिमाही निकाल 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निव्वळ नफा 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत 20 टक्क्यांनी वाढून 2,487 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एक्स्चेंजचा महसूल 34 टक्क्यांनी वाढून 4,625 कोटी रुपयांवर पोहोचला. 2023-24 मध्ये एनएसईचा नफा 13 टक्क्यांनी वाढून 8,306 कोटी रुपये झाला, तर महसूल 25 टक्क्यांनी वाढून 14,780 कोटी रुपये झाला. एनएसईचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू 25 टक्क्यांनी वाढून 14,780 कोटी रुपये झाला आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार