शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

'दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर अभिमान..."; आमदार सुनिल शेळकेंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:46 IST

मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता आमदार सुनिल शेळके यांनी मोठे विधान केले आहे.

मागील काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका झाल्याचे बोलले जात आहे, आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी याबाबत विधान केले आहे.अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी "सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही," असे विधान करत विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत.

किम जोंग उनचा 'ब्रह्मास्त्र' तयार! संपूर्ण अमेरिका क्षेपणास्त्राच्या टप्प्यात; नव्या इंजिन चाचणीने लष्करी ताकद वाढली

"दादांच्या दुर्घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही मंडळी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष एकत्रित पुढे जायचं आहे, परंतु अशा पद्धतीने आमच्याशी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी दादांनी विस्तृतपणे चर्चा केलेली नव्हती, परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि उत्तर अधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी आल्या पाहिजेत, आदरणीय अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ती जबाबदारी, तो मान, सुनेत्रा वहिनींना मिळाला पाहिजे होता. ही आमची भूमिका स्पष्ट होती, असेही सुनील शेळके म्हणाले.

"आज सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होत असेल सुनेत्रा वहिनींचा नेतृत्व त्यांना मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असेल तर तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल, आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनी सकारात्मकपणांनी पाहायला पाहिजे",असेही सुनील शेळके म्हणाले.

...तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, दैनंदिन कामकाज करताना अजित दादांची उणीव पावलोपावली भासत आहे. दादांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांची दादांशी चर्चा झाली असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत होते. "दादांचे उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सन्मान मिळायला हवा, ही भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडली असून ती योग्यच आहे.

"उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल, असेही आमदार शेळके म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Merger of Both NCP Factions Would Be a Pride: MLA Shelke

Web Summary : MLA Sunil Shelke hinted at a merger of both NCP factions under Sunetra Pawar's leadership. He expressed pride if the party grows under her leadership, stating it would be a moment of joy if both groups unite, strengthening the NCP.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार