शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना धडा शिकविण्याची गरज

By admin | Updated: March 21, 2015 00:22 IST

राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे : धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे षडयंत्र राजकारण्यांकडून सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.अ‍ॅड. श्रीधर कसबेकर लिखित ‘अ‍ॅड. राम जेठमलानी- ए डायनामिक पर्सनॅलिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन जेठमलानी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयातील अशोका सभागृहात हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेरंब गानू, अ‍ॅड. योगेश पवार, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार साधना बोरकर, संजीव जाधव, सदस्य अ‍ॅड. सुधीर मुळे उपस्थित होते.जेठमलानी म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्मनिरपेक्ष नागरिक असल्याचा अभिमान वाटायला हवा. मी स्वत: धर्मनिरपेक्ष नागरिक आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या धर्माप्रमाणेच इतरांचा धर्मही मोठा आहे, हे मानन्याचा मोठेपणा प्रत्येकामध्ये असायला हवा. स्वत:च्या धर्मातील चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगण्याबरोबरच त्यातील ज्ञान आणि शिक्षण घ्यायला हवे. पूर्वी वकिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदरार्थी होता. लोकांच्या हितासाठी लढा देणाऱ्या वकिलांनी पक्षकारांकडून पैसे घेणे हे लाच घेण्यासारखे समजले जात असे. (प्रतिनिधी)खंत वाटते...४वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना सांगितले जात नाही. वकील असण्याबरोबरच राजकारणी, कायद्याचा शिक्षक आणि पत्रकार अशा भूमिकाही बजावल्याचे सांगत जेठमलानी यांनी राजकारणी असल्याबद्दल खंत वाटत असल्याचे नमूद केले.