शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे एकाला आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 22:35 IST

मुंबईतील सायबर विभागाच्या पथकाला पुण्यातील एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन मिळाली.

पुणे : सोशल मिडियावर सजगतेने नजर ठेवणा-या राज्याच्या सायबर विभागामुळे शनिवारी एका तरुणाला आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांनी यश आले आहे. हा प्रकार सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान घडला.

हा तरुण कॅबचालक म्हणून काम करतो. तो मूळचा उस्मानाबादचा असून सध्या पत्नीसह हडपसरमध्ये राहत आहे. एमपीएससी करुन शासकीय अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न आहे.  त्यासाठी तो गेल्या ३ वर्षांपासून पुण्यात येऊन राहत आहे. एका बाजूला परिक्षेची तयारीचे टेन्शन, दुसरीकडे पोटापाण्यासाठी कॅब चालविणे व घरात पत्नीशी होणारी वादावादी यामुळे निराश झालेल्या या तरुणाने फेसबुकवर आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश टाकला. 

मुंबईतील सायबर विभागाच्या पथकाला पुण्यातील एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन मिळाली. सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला दिली.

सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि पथकाने तातडीने त्या व्यक्तीविषयीची माहिती संकलित केली. तांत्रिक तपासात आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेली व्यक्ती हडपसर भागातील असल्याचे समजले. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर तातडीने पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीचे घर शोधूनकाढले.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या व्यक्तीला रोखले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान, या घटनेची नोंद हडपसर पोलिसांकडून करण्यात आली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसFacebookफेसबुक