Pune: २५० फूट कड्यावरून उडी घेणार्‍या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला; समुपदेशनातून टळला अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:16 IST2026-03-20T19:15:34+5:302026-03-20T19:16:36+5:30

प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कौटुंबिक कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी येथे आल्याचे सांगितले

Police save woman who jumped from 250-foot cliff; counseling averts disaster | Pune: २५० फूट कड्यावरून उडी घेणार्‍या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला; समुपदेशनातून टळला अनर्थ

Pune: २५० फूट कड्यावरून उडी घेणार्‍या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला; समुपदेशनातून टळला अनर्थ

धनकवडी (पुणे) : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी घडलेल्या थरारक घटनेत पोलिसां च्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचवण्यात आला. नवीन कात्रज बोगद्याजवळील मुंबई-पुणे-सातारा महा मार्गा लगत सुमारे २०० ते २५० फूट उंच डोंगराच्या कड्यावर उभी राहून जीवन संपवण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचे पोलिसांनी समुपदेशन करून तिला सुरक्षित खाली आणले.

आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली.  माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित महिला डोंगराच्या कड्यावर उभी असून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. परिस्थितीची गंभीरता ओळखून पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दल व रुग्णवाहिकेला पाचारण केले.

यानंतर पोलिसांनी डोंगराच्या दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी पोहोचत महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र पोलिसांनी संयम, समजूतदारपणा आणि प्रभावी समुपदेशनाच्या जोरावर तिचे मन वळवले. अखेर तिला सुरक्षितपणे खाली आणण्यात यश मिळाले. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कौटुंबिक कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी येथे आल्याचे सांगितले. 

Web Title : पुणे: पुलिस ने महिला को चट्टान से कूदने से बचाया; काउंसलिंग से टला हादसा

Web Summary : पुणे पुलिस ने सतर्कता दिखाते हुए कात्रज सुरंग के पास 250 फीट ऊंची चट्टान से कूदकर आत्महत्या करने की कोशिश कर रही एक महिला को बचाया। अधिकारियों द्वारा प्रभावी काउंसलिंग से पारिवारिक कारणों से जुड़ी संभावित त्रासदी टल गई।

Web Title : Pune: Police Save Woman from Cliff Jump; Counseling Averts Tragedy

Web Summary : Pune police swiftly rescued a woman attempting suicide by jumping from a 250-foot cliff near Katraj tunnel. Effective counseling by officers successfully dissuaded her, averting a potential tragedy linked to family issues.