पोलीसही आॅनलाईन

By Admin | Updated: June 26, 2015 04:19 IST2015-06-26T04:19:10+5:302015-06-26T04:19:10+5:30

: पुणे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणी आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील १० पोलीस ठाणी ‘गो-लाईव्ह’ प्रणाली

Police online | पोलीसही आॅनलाईन

पोलीसही आॅनलाईन

जेजुरी : पुणे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणी आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील १० पोलीस ठाणी ‘गो-लाईव्ह’ प्रणाली अंतर्गत आॅनलाईन करण्यात आली आहेत. आजपासून ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे संगणकीकृत करुन ती सतत पोलीस अधिक्षक कार्यालयासह एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पोलीस खात्याकडून ‘गो-लाईव्ह’ ही संगणक प्रणाली विकसीत केली आहे. ही प्रणाली योग्य रीतीने चालावी म्हणून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर जेजुरी, वडगाव निंबाळकर, बारामती शहर, वेल्हे, घोडेगाव, शिरूर, मंचर, लोणावळा शहर, आळंदी व दौंड या दहा पोलीस ठाण्यांत आजपासून सुरू करण्यात आली आहे.
यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे पोलीस अधिक्षक कार्यालयासह एकमेकांशी आॅनलाईन जोडली जाणार आहेत. याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यातील घटना, गुन्ह्याची माहिती, अपघातांची माहिती, आरोपींची माहिती, बंदोबस्ताची सर्वच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. साधी एन. सी. अथवा फिर्याद रजिस्टर्ड झाली की ती गो-लाईव्ह प्रणालीतून जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात पोहोचणार आहे. गुन्ह्याच्या तपास कामात मोठे सहकार्य मिळणार आहे. शिवाय दाखलेही त्वरीत उपलब्ध होणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Police online