शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले?

By नम्रता फडणीस | Updated: March 18, 2025 18:23 IST

या वकिलानेनंतर हडपसर पोलिस स्टेशन गाठत मारहाण झाल्याची तक्रार दिली.

पुणे -  स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली होती. आता याच प्रकरणातील दत्तात्रय गाडे यांच्या एका वकिलाकडे काम करणा-या सहाय्यक वकिलाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

साहिल डोंगरे असे मारहाण झालेल्या सहाय्यक वकिलाचे नाव आहे. दत्तात्रय गाडे याचे वकील वाजिद खान बिडकर यांच्याकडे अँड डोंगरे हे सहाय्य्क वकील म्हणून काम करतात. त्यांच्या सहाय्यक वकिलावर हल्ला झाल्याच्या प्रकाराला वाजिद खान बिडकर यांनीही दुजोरा दिला आहे. वाजिद खान बिडकर यांनी साहिल डोंगरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात डोंगरे सांगत आहेत की रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास एका केस संदर्भात मी हडपसर पोलीस स्टेशन येथे गेलो होतो. एक क्लाईंट मला भेटून् गेला आणि त्याने मला 54 हजार् रुपये दिले होते. मला सारखे वाटत होते की कुणीतरी माझा पाठलाग करीत आहे.

मी तिथून पेट्रोल संपले म्हणून पाऊण ते एक च्या सुमारास पेट्रोल पंपावर गेलो होतो. रस्त्याच्या कडेला मला कुणीतरी मदत् मागितली तिथे गेलो. अचानक् मागून एक गाडी आली. मला गाडीत घातले आणि डोळे उघडले. तेव्हा मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आले. मी स्वत: कसा आलो हे माझे मला माहिती आहे,. मारहाण झाल्यानंतर मी स्वत: जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

स्वारगेटची घटना काय होती?

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर फलटणला निघालेल्या तरुणीला चुकीच्या शिवशाही बसमध्ये नेऊन आरोपीनं तिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार केला. २८ फेब्रुवारी रोजी पहाटे दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गाडे याचे वकील पत्र अँड वाजिद खान-बिडकर, अँड साजिद शाह आणि अँड सुमित पोटे यांनी घेतले आहे. आरोपीच्या माहितीवरून गाडे चे वकील अँड सुमित पोटे यांनी पीडितेला आरोपीने ७५०० रुपये दिल्याचे वादग्रस्त विधान करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अँड पोटे यांनी न्यायालयात असा कोणताही युक्तिवाद केला नव्हता. केवळ आरोपीच्या माहितीवरून सांगितल्याचे स्पष्ट करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. 

 

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकswargate bus depotस्वारगेट बसस्थानकSwargateस्वारगेट