शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

काही वेळापूर्वी ड्युटीवरून घरी गेलेल्या अधिकार्‍याच्या निधनाने हळहळलं पोलीस नियंत्रण कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 9:48 PM

पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : शहर पोलीस दलातील पोलीस नियंत्रण कक्षेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर (वय ५४) यांचे गुरुवारी सायंकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवसभर पोलीस नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर दुपारी २ वाजता ते वडगाव शेरी येथील घरी गेले होते. घरी त्यांना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चक्कर आली व ते खाली पडले़. घरातील लोकांनी त्यांनातातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

आपल्याबरोबर काही वेळापूर्वी काम करुन घरी गेलेल्या अधिकार्‍यांचे असे निधन झाल्याचे वृत्त समजताच नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांना धक्काचबसला. भापकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्या घरी धाव घेतली.शांत, संयमी आणि मनमिळावू अधिकारी अशी रावसाहेब भापकर यांची ओळख होती. गेल्या ११ महिन्यांपासून ते पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते.त्यापूर्वी वानवडी पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. चिंचवड पोलीस ठाण्यातही त्यांनी काही काळ काम केले होते. भापकर हे मुळचे नगर जिल्ह्यातील राहणारे होते. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका