शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस शिपायासह निवृत्त पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:40 IST

- वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

पुणे : वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारणारा कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिस शिपायासह त्याला मदत करणाऱ्या एका निवृत्त पोलिस उप निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ बापू महारनवर (३४ वर्षे, रा. शेवाळवाडी ता. हवेली) असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे तर युवराज कृष्णा फरांदे (५९ वर्षे, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) असे महारनवर याला मदत करणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका भाडेकरूसह त्याच्या घर मालकावर वीजचोरीचा गुन्हा दाखल आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्याला अटक न करण्यासाठी महारनवर याने ५ हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर घर मालकाने महारनवर याला ५ हजार रुपये दिले. या लाचेची चर्चा झाल्यानंतर महारनवर याने भाडेकरूकडे ५ हजारांची मागणी केली व ती रक्कम घर मालकाला देण्यास सांगितले. तसेच सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक फरांदे याने त्यांना फोनवर लाच देण्याची मागणी करत महारनवर याला मदत केली.

याबाबत भाडेकरूने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर महारनवर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सोमवारी कोंढवा पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा लावला होता. ठरल्यानंतर तक्रारदार व त्याचा घरमालक पोलिस स्टेशनसमोर गेले. त्यावेळी तेथे पोलिस शिपाई महारनवर हाही उपस्थित होता. तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना चपतच्या पथकाने महारनवरला रंगेहाथ पकडले. तसेच महारनवर व फरांदे या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उप आयुक्त, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

पोलिस स्टेशनमध्ये किंवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध प्रकार व घडना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस आयुक्तांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात लाच स्वीकारण्याची घटना घडली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सोमवारी रात्री पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची यंत्रण कक्षात बदली केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Retired Police Sub-Inspector, Constable Caught in Bribery Case

Web Summary : Pune: A police constable and retired sub-inspector were arrested for accepting a bribe to help in an electricity theft case. The constable demanded ₹5,000, leading to their apprehension by the Anti-Corruption Bureau. Senior police inspector transferred after the incident.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याBribe Caseलाच प्रकरण