मध्यरात्री पीएमपीला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:41 IST2019-02-28T15:40:36+5:302019-02-28T15:41:41+5:30
पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असून आज पहाटे काेथरुड डेपाे जवळ पीएमपीच्या बसला आग लागली.

मध्यरात्री पीएमपीला लागली आग
पुणे : पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असून आज पहाटे काेथरुड डेपाे जवळ पीएमपीच्या बसला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. पीएमपीच्या पुढील बाजूस ही आग लागली हाेती. यात पीएमपीचे माेठे नुकसान झाले.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मध्यरात्री 2.37 मिनिटांनी पीएमपीच्या बसला आग लागली. ही बस मार्गावर असताना बंद पडली हाेती. रात्री पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी बस दुरुस्त करुन ही बस काेथरुड डेपाेला नेण्यात येत हाेती. चालकाच्या सीटच्या खालच्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागली हाेती. या बसच्या शेजारुन जाणाऱ्या एका चारचाकी चालकाच्या लक्षात ही गाेष्ट आल्यानंतर त्याने चालकाच्या निर्दशनास ही बाब आणून दिली. त्यानंतर बस चालकाने बस थांबवून अग्निशमन दलाला फाेन केला. अग्निशमन दलाने अवघ्या 10 मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. यात कुठलिही जीवित हानी झाली नाही.
या घटनेनंतर पुन्हा एकदा पीएमपीच्या बसेसला सातत्याने लागणाऱ्या आगीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बसला लागलेली आग फायरमन बाबू शितकल, नितीन घुले, याेगेश चव्हाण, अतुल डगळे, दिपक पाटील यांनी आटाेक्यात आणली. याकामी तांडेल अंगद लिपाणे, वाहनचालक रामचंद्र अडसूळ यांनी मदत केली.