शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:09 PM

‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकायद्यातील तरतुदीपासून अनभिज्ञ : पीएमपीकडूनही दिली जात नाही माहितीतक्रार कक्षाक दर महिन्याला तब्बल १७०० ते १८०० तक्रारी बसविषयीच्या प्रवाशांच्या तक्रारींचा दखल घेणे आवश्यक

पुणे : ब्रेकडाऊन, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र नसणे, आसनांची दुर्दशा अशा अनेक प्रकारच्या तक्रारींचा पाऊस पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)वर पडत आहे. पण प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. पण याबाबत या दोन्ही यंत्रणा अनभिज्ञ आहेत. आतापर्यंत एकदाही ‘आरटीओ’कडून दैनंदिन तक्रारींची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे.‘पीएमपी’कडे स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा आहे. दुरध्वनी, मोबाईल, वॉट्सअप, ईमेल, लेखी अशा विविध माध्यमातून प्रवासी, नागरिकांना तक्रारी करता येतात. दर महिन्याला तब्बल १७०० ते १८०० तक्रारी तक्रार कक्षाकडे येत असतात. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रवाशांना त्यावर केलेली कार्यवाही ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. या तक्रारींमध्ये चालक व वाहकाचे वर्तन, ब्रेकडाऊन, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र नसणे, आसनांची दुर्दशा, बसची अनियमितता, मार्ग फलक नसणे, थांब्यावर न थांबणे, थांब्याची दुरावस्था, बसची दुरवस्था अशा विविध तक्रारींचा समावेश असतो. प्रामुख्याने बसच्या दुरावस्थेच्या तक्रारीच अनेक असतात. प्रवाशांचा प्रवास असुरक्षित होत असल्याच्या तक्रारीही प्रवाशांकडून केल्या जातात. कायद्यातील तरतुदीनुसार, संबंधित यंत्रणेने तक्रारींची योग्यप्रकारे नोंद ठेवणे, त्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच ही नोंदवही आरटीओला पाठविणे, त्यावर आरटीओकडून त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. या प्रक्रिया सातत्यपुर्ण असायला हवी. पण प्रत्यक्षात एकदाही तक्रार नोंदवहीची देवाणघेवाण झालेली नाही. पीएमपी प्रवासी मंचचे सतिश चितळे यांनी याबाबत आरटीओकडून माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. पण काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांना कळविले आहे. तसेच अपिलामध्येही आरटीओतील अधिकाºयांना कायद्यातील तरतुदीबाबत माहितीच नसल्याचे दिसून आले, असे चितळे यांनी सांगितले. ............‘आरटीओ’कडून बसला योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे त्यांनी बसविषयीच्या प्रवाशांच्या तक्रारींचा दखल घेणे आवश्यक आहे. पण यापूर्वी कधीही तक्रार नोंदवहीची दखल घेतली नाही. तसेच आरटीओकडे स्वतंत्रपणे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. - संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच ......पीएमपी सेवेतील त्रुटी तसेच बसची अवस्था यासंदर्भात नागरिकांनी तीन वर्षात केलेल्या तक्रारींचा आढावा आरटीओकडून घेतला गेला असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती सतिश चितळे यांनी मागविली होती. त्यावर जनमाहिती अधिकारी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी ही माहिती ‘अभिलेखावर उपलब्ध नाही’ अशी माहिती दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेRto officeआरटीओ ऑफीसpassengerप्रवासी