शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची वाहक भरती परीक्षा रद्द

By admin | Updated: July 23, 2014 23:40 IST

पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू  केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमकेसीएलच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांपूर्वीच राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या भरतीसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, आता  पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसताना ही भरती करून त्यांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले असल्याची माहिती संचालक प्रशांत जगताप यांनी आज दिली. 
    केंद्राच्या  जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसह (जेएनएनयूआरएम) डिफर्ड पेमेंट आणि भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात पंधराशेहून अधिक बस दाखल होणार आहेत.  त्यामुळे ताफ्यातील बसची संख्या वाढल्याने कर्मचा:यांवर ताण येऊ नये, यासाठी बस येण्याआधीच त्यासाठी वाहकांची भरती करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. त्यासाठी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) माध्यमातून सर्व ऑनलाइन प्रक्रिया राबविली गेली. गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, भाडेतत्त्वावरील बसचा अपवाद वगळता उर्वरित 1 हजार बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाच रखडली आहे. मात्र, असे असतानाच ही भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आधीच बसून असलेल्या कर्मचा:यांना काम देणो शक्य नसताना नवीन कर्मचा:यांना काम देता येणार नसल्याची बाब संचालक मंडळाच्या लक्षात आली.  
भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन पीएमपीत रुजू झाल्यानंतर संबंधित सेवकांना काम देता आले नाही, तर त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून ही प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन बस ताफ्यात दाखल होण्याचा कृती अहवाल तयार होईपयर्ंत पुढील प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले. तसेच, कंडक्टर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया संशयास्पद होती. एमकेसीएलतर्फे त्यासाठी काढण्यात आलेला पेपरही अवघड होता. त्यामुळे, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी 
केली आहे.(प्रतिनिधी)
 
संचालक मंडळ 
झोपले होते काय ?
प्रशासनाने राबविलेली ही प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी लेखी परीक्षाही झाली. मात्र, अचानक ही फसवणूक असल्याचा साक्षात्कार संचालक मंडळास झाला आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झोपलेले संचालक मंडळ जागे झाले काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.