PMP bus enters directly at the hotel ...after Break failed | पुन्हा एकदा रडगाणं.. ! ब्रेक झालं निकामी..पीएमपी बस घुसली थेट हॉटेलात...
पुन्हा एकदा रडगाणं.. ! ब्रेक झालं निकामी..पीएमपी बस घुसली थेट हॉटेलात...

ठळक मुद्देब्रेक निकामी झाल्याने झाला अपघात 

पुणे : पुण्यात वडगाव बुद्रुक येथे ब्रेक निकामी झाल्यामुळे सिंहगड कॉलेजच्या तीव्र उतारावरून सुसाट सुटलेली पीएमपी बस थेट हॉटेलमध्ये घुसली.सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही .ही घटना गुरुवारी (दि. १५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिंहगड कॉलेज जवळ  येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बस चालक सोपान शिवराम जांभळे व वाहक मोहन शिवदास दहिवळ हे पावणेचार वाजता सिंहगड कॉलेज बस थांब्यावरून बस ( एमएच-१२.एफसी.९४३५) घेऊन स्वारगेटकडे  जात असताना कॉलेजच्या उतारावरून खाली येत असताना ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला धडकावली. परंतु, बस उतारावरून वेगाने आल्याने कठड्याला धडकून हॉटेलमध्ये शिरली.


Web Title: PMP bus enters directly at the hotel ...after Break failed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.