शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी नाही, पुणे मनपाकडून निर्णय स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 10:10 AM

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता.

पुणे : शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. चौफेर टीका झाल्यानंतर पुणे मनपा हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.  पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य होणं बाकी होतं. त्याआधीच प्रशासनाने या निर्णयावर स्थगिती आणली आहे.

31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी (19 जानेवारी)महापालिकेने वृत्तपत्रांमधून खासगी कार्यक्रमांवरील बंदी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. 

काय आहे पार्श्वभूमी - शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली व त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व प्रकारच्या खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.. यासाठी पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांना सूनचा देण्यात आल्या होत्या. भविष्यात अशा वादग्रस्त कार्यक्रमांमुळे उद्भवणारे वाद टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत अधिकृत अध्यादेश लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले होते.

पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवारवाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनालादेखील वेगळी ओळख मिळाली आहे. याच शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनजू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल उसळल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

कार्यक्रमांमुळे वाहतूककोंडी : शनिवारवाड्यालगतच संवेदनशील परिसर असून, शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या भागात एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कार्यक्रमामुळे येथे मोठी वाहतूककोंडीदेखील होत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने महापालिकेला कळविण्यात आले होते. तसेच राज्याच्या विविध भागांतून शनिवारवाडा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली देखील येतात. कार्यक्रमांमुळे बाहेरून येणा-या पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत नाही. यामुळेच महापालिकेच्या वतीने यापुढे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती.  

टॅग्स :shanivar wadaशनिवारवाडाPuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव