शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mayor : पुणे महापालिकेत पदवाटपाची चर्चा; खडकवासला, वडगाव शेरी, शिवाजीनगर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 21:45 IST

पुणे महापालिकेत महिलाराज; महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी आरक्षित; तापकीर, नागपुरे, टिळेकर, देशपांडे, बापट, एकबोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा

पुणे : पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पालिकेत महिलाराज येणार आहे. त्यामुळे या पदावर भाजपमधील नगरसेविकेची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट, निवेदिता एकबोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. महापौरपदाचीआरक्षण सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीमध्ये सहा मजल्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यात पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर या २००७, २०१२, २०१७ आणि आता निवडून आल्या आहेत. त्या सलग चौथ्यांदा सभागृहात आल्या आहेत. 

२०१७ मध्ये पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना वर्षा तापकीर यांना कुठल्याही पदावर संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वर्षा तापकीर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. नगरसेविका मंजुषा नागपुरे या २०१२, २०१७ आणि आता निवडून आल्या आहेत. त्या सलग तिसऱ्यांदा सभागृहात आल्या आहेत. नगरसेविका रंजना टिळेकर या सलग चौथ्यांदा पालिकेच्या सभागृहात आल्या आहेत. मानसी देशपांडे या तिसऱ्यांदा तर स्वरादा बापट आणि निवेदिता एकबोटे या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत......महिला सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने अनेकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगलेपुणे महापालिकेच्या २०१२ मध्ये महिला ओबीसीचे तर २०१७ या निवडणुकांच्या वेळी महापौरपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण होते. त्यामुळे अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली होती. पालिकेची निवडून झाल्यानंतर महापौरपदासाठी आपलेच नाव निश्चित आहे. या आशेवर भाजपमधील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. अनेक भागात महापौरपदाच्या शुभेच्छा असे फलक देखील लावण्यात आले होते. मात्र महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांची निराशा झाली आहे. त्यामुळे माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांच्यासह अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले आहेत........भाजप कुणाला संधी देणार याची उत्सुकतामहापालिका निवडणुकीत ११९ जागा जिंकून एकहात्ती सत्ता आलेल्या भाजप महापौरपदाची माळ अनुभवी महिला नगरसेविकेच्या गळ्यात टाकणार की धक्कातंत्र वापरून नवीन महिला चेहऱ्याला संधी देणार? याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच आयत्या वेळी अनुभवी नावे मागे पडून अनपेक्षित नाव पुढे येईल असाही कयास बांधला जात आहे. महापालिकेत सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच महापौरपद द्यावे, अशी शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे........खडकवासला, वडगावशेरी, शिवाजीनगर मतदारसंघाला संधी मिळण्याची शक्यतामहापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले अडीच वर्ष कसबा आणि त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघात महापौरपद देण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेतेपदी पर्वती आणि कसबा या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली. त्यामुळे यंदा खडकवासला, वडगाव शेरी, शिवाजीनगर, हडपसर विधानसभा मतदारसंघाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे........पुणे महापालिकेत आतापर्यंत नऊ महिला महापौरकमल व्यवहारे २० मार्च १९९६ॲड. वंदना चव्हाण १५ मार्च १९९७वत्सला आंदेकर २० मार्च १९९८दिप्ती चवधरी १५ मार्च २००२रजनी त्रिभुवन १५ मार्च २००५राजलक्ष्मी भोसले १५ मार्च २००७वैशाली बनकर १५ मार्च २०१२चंचला कोंद्रे ५ सप्टेंबर २०१३मुक्ता टिळक १५ मार्च २०१७

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Mayor Post: Discussions on seat allocation; key constituencies in the lead.

Web Summary : Pune's mayoral seat is reserved for women. BJP contenders include Varsha Tapkir. Experienced candidates may be overlooked for fresh faces. Khadakwasla, Vadgaon Sheri, and Shivajinagar constituencies have high chances.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MayorमहापौरPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र