पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुरुष मतदारांची संख्या ४४ लाख ९१ हजार ६८, तर महिलांची संख्या ही ४१ लाख ५५ हजार ३३० इतकी आहे. पुण्यात भाजपने आघाडी घेतली असून सहकारनगरच्य प्रभागातून आबा बागुल पिछाडीवर असून भाजपच्या वीणा घोष या आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप हे सुद्धा त्याच प्रभागातून पिछाडीवर आहेत.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे,.
पुणे महानगरपालिका प्रमुख लढत
प्रभाग क्रमांक - एकमेकांसमोरील उमेदवाराचे नाव ( पक्ष )
५ योगेश मुळीक ( भाजप ) - संदीप जऱ्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस )
५ नारायण गलांडे ( भाजप ) - सचिन भगत (राष्ट्रवादी काँग्रेस )७ रेश्मा भोसले ( भाजप ) - दत्ता बहिरट (राष्ट्रवादी काँग्रेस )
९ गणेश कळमकर ( भाजप ) - बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी काँग्रेस )१० दिलीप वेडे पाटील ( भाजप ) - शंकर ऊर्फ बंडू केमसे (राष्ट्रवादी काँग्रेस )
१४ उमेश गायकवाड ( भाजप ) - बंडू गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)१६ मारुती तुपे ( भाजप ) - योगेश ससाणे (राष्ट्रवादी काँग्रेस ) - विजय देशमुख (उद्धवसेना. )
१८ कालिंदी पुंडे ( भाजप) - रत्नप्रभा जगताप ( काँग्रेस )१८ अभिजित शिवरकर ( भाजप ) - प्रशांत जगताप ( काँग्रेस )
१९ हाजी गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस ) - प्रसाद बाबर ( उद्धवसेना. )२१ श्रीनाथ भिमाले ( भाजप ) - अक्षय जैन ( काँग्रेस )
२३ पल्लवी जावळे ( भाजप ) - सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस )२७ धीरज घाटे ( भाजप ) - अशोक हरणावळ (राष्ट्रवादी काँग्रेस )
३६ महेश बावळे ( भाजप ) - आबा बागुल (शिंदेसेना )२४ गणेश बिडकर ( भाजप ) - प्रणव धंगेकर (शिंदेसेना )
३१ पृथ्वीराज सुतार ( भाजप ) - किशोर शिंदे (मनसे )३१ दिनेश माथवड ( भाजप )- योगेश मोकाटे (उद्धवसेना )
३० सुशील मेंगडे ( भाजप ) - स्वप्निल दुधाणे (राष्ट्रवादी काँग्रेस )३२ सायली वाजंळे ( भाजप ) - दीपाली धुमाळ (राष्ट्रवादी काँग्रेस )
३३ किशोर पोकळे ( भाजप ) - काका चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस )३४ हरिदास चरवड ( भाजप ) - नीलेश गिरमे (शिंदेसेना )
३८ व्यंकोजी खोपडे ( भाजप ) - प्रकाश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस ) - वसंत मोरे (उद्धवसेना ) - स्वराज बाबर - (शिंदेसेना )४० वृषाली कामठे ( भाजप )- संगीता ठोसर (शिंदेसेना )
४० रंजना टिळेकर ( भाजप ) - रूपेश वसंत मोरे (उद्धवसेना ) - गंगाधर बधे (राष्ट्रवादी काँग्रेस )४१ फारूख इनामदार (राष्ट्रवादी काँग्रेस ) - प्रमोद भानगिरे (शिंदेसेना).
Web Summary : In Pune's PMC elections, BJP leads. Aaba Bagul and Subhash Jagtap trail in Sahakarnagar, while BJP's Veena Ghosh is ahead. The election is a multi-cornered fight with BJP, Shinde Sena, NCP alliance, and Congress-Uddhav Sena-MNS contesting.
Web Summary : पुणे पीएमसी चुनावों में, भाजपा आगे है। आबा बागुल और सुभाष जगताप सहकारनगर में पीछे हैं, जबकि भाजपा की वीना घोष आगे हैं। चुनाव भाजपा, शिंदे सेना, एनसीपी गठबंधन और कांग्रेस-उद्धव सेना-मनसे के साथ एक बहुकोणीय लड़ाई है।