शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आधी पाण्याचे नियोजन करा

By admin | Updated: September 4, 2015 01:59 IST

भोर, वेल्हे तालुक्यातील पाण्याचे जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत धरणातील पाणी खाली सोडून दिले जाणार नाही. पाण्यासाठी पाणी बचाव समिती स्थापन करून वेळ

भोर : भोर, वेल्हे तालुक्यातील पाण्याचे जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत धरणातील पाणी खाली सोडून दिले जाणार नाही. पाण्यासाठी पाणी बचाव समिती स्थापन करून वेळ पडल्यास राष्ट्रीय महामार्गही अडवला जाईल, असा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी दिला.न्हावी येथे संग्राम थोपटे यांची जिल्हा बॅँकेच्या संचालकपदी व राजगड कारखान्याच्या अध्यक्षपदी व भोरच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. जयश्री शिंदे यांची निवड, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार समारंभ झाला. कॉँग्रेसचे तालुकाध्य शैलेश सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, कॉँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, आनंद आंबवले, पोपट सुके, सुवर्णा मळेकर, हनुमंत शिरवले, गीतांजली शेटे, किसन वीर, उमेश देशमुख, सीमा सोनवणे, के. डी. सोनवणे, अशोक शिवतरे, रामनाना सोनवणे, राजकुमार शिंदे, निसार नालबंद, शंकर धाडवे, पल्लवी सोनवणे, तुकाराम रोमण व ग्रामस्थ उपस्थित होते.अशोक चव्हाण यांनी प्रस्ताविक केले, तर धनाजी सोनवणे यांनी स्वागत केले. गावातील दलितवस्ती व मंदिराच्या विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली. थोपटे म्हणाले, की भोर-वेल्हे तालुक्यातील तीन धरणांचे मिळून ३८ टक्के पाणी आडवले जाते. वास्तविक भाटघर धरणाचेच पाणी बारामतीला दिले पाहिजे. मात्र, तीनही धरणांचे पाणी खाली नेले जाते. शिवाय जोपर्यंत कालवे अपूर्ण आहेत तोपर्यंत नीरा नदीने पाणी सोडण्याचा चुकीचा निर्णय विरोध असतानाही मागच्या मंत्रिमंडळाने घेतल्याने पाणी पळवले जाते. नीरा-देवघरचे पाणी भोर, खंडाळा, फलटण या लाभ क्षेत्रातील लोकांना देणे गरजेचे आहे. तरीही कालवे अपूर्ण असल्याचे कारण देत संपूर्ण पाणी खाली नेले जाते. हा इतर तालुक्यावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. सध्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी २३०० क्युसेक्सची गरज असताना मागील आठ दिवसांपासून ३ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. अधिकाऱ्यांचीही मुजोरगिरी सुरू आहे. ते सहन केले जाणार नाही.या वेळी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक राजाराम धोंडे यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी शैलेश सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.(वार्ताहर)