पालखी महामार्गावर पुन्हा खड्डा!

By Admin | Updated: June 22, 2016 00:51 IST2016-06-22T00:51:16+5:302016-06-22T00:51:16+5:30

सासवड-जेजुरी या पालखी महामर्गावर पालखीच्या आगमनापूर्वी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करीत अनेक भागात रस्त्याची, पुलांच्या कठड्यांच्या दुरुस्तीची कामे गतीने सुरू असतानाच नव्याने

Pitachhi highway again! | पालखी महामार्गावर पुन्हा खड्डा!

पालखी महामार्गावर पुन्हा खड्डा!

खळद : सासवड-जेजुरी या पालखी महामर्गावर पालखीच्या आगमनापूर्वी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करीत अनेक भागात रस्त्याची, पुलांच्या कठड्यांच्या दुरुस्तीची कामे गतीने सुरू असतानाच नव्याने कामे झालेल्या भागात अनेक ठिकाणी पाणी साठल्यानंतर डांबरच वाहून गेले. त्यामुळे पालखीमार्गावर खड्डे पडल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट, अशी परिस्थिती या कामाच्या बाबतीत पाहावयास मिळत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम
होत असताना जेथे जेथे पाणी साठते तेथे मोठमोठे खडड्े
पडतात. अशा भागात तसेच या रस्त्याचे चौपदरीकरण बंद झाल्याने ज्या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमीन संपादित झाली आहे.
पहिला मूळ रस्ताच जवळपास दीड-दोन फूट खडड््यात आहे. येथे सातत्याने अपघात होतात. या भागात भराव टाकून त्यानंतर डांबरीकरण होणे गरजेचे होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली, पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च केले, तरी माऊलींची वाट ही बिकटच राहिली आहे. पालखी काळात पाऊस आला की वैष्णवांच्या मेळ्याला या खडतर वाटेनेच प्रवास करावा लागणार आहे.

 

Web Title: Pitachhi highway again!