पुणे: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांची फसवणूक करून लुबाडणाऱ्याला वानवडी पोलिसांनी अटक केली. ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी त्याने हे पैसे लुटल्याचे समोर आले आहे. आयाज कासम शेख (वय ४०, रा. लोहगाव) असे त्याचे नाव आहे. याबाबत वानवडी येथील ७३ वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली होती.
फिर्यादी हे १५ मार्च रोजी जगताप चौक, वानवडी येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. स्क्रीन काळी झाली असता, आरोपीने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने पिन क्रमांक टाकण्यास सांगितला. आरोपीने तो क्रमांक पाहिला होता. त्यानंतर त्याने ज्येष्ठाला सुरक्षा रक्षकाला बोलवून घेण्यास सांगितले. त्याच संधीचा फायदा घेत आरोपीने ज्येष्ठाच्या एटीएम कार्डचा वापर करून ४० हजार रुपये काढून घेतले. तसेच दुसऱ्या एका ज्येष्ठाची देखील त्याने अशाचप्रकारे फसवणूक करून पैसे काढून घेतले. दरम्यान, याबाबत तक्रार दाखल होताच वानवडी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो पीएमपी बसने प्रवास करत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
Web Summary : A 40-year-old man was arrested in Wanwadi for stealing ₹40,000 from a senior citizen at an ATM. He pretended to help with the ATM, noted the PIN, and then withdrew the money for online gambling. Police caught him while he was traveling by bus.
Web Summary : पुणे के वानवडी में एक 40 वर्षीय व्यक्ति को एटीएम में मदद के बहाने एक वरिष्ठ नागरिक से ₹40,000 चुराने के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने पिन देखा और ऑनलाइन जुए के लिए पैसे निकाले। पुलिस ने उसे बस से यात्रा करते समय पकड़ा।