पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने ॲसिड पिऊन उचललं टोकाचं पाऊल;चाकण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:05 IST2025-04-23T16:04:18+5:302025-04-23T16:05:59+5:30

- आरोपी अक्षयने वेगवेगळ्या कारणांवरून फिर्यादी यांच्या मुलीसोबत भांडण केले.

Pimpri Chinchwad news Tired of torture wife commits suicide by drinking acid | पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने ॲसिड पिऊन उचललं टोकाचं पाऊल;चाकण येथील घटना

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने ॲसिड पिऊन उचललं टोकाचं पाऊल;चाकण येथील घटना

पिंपरी : पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने बाथरूममधील ॲसिड पिऊन आत्महत्या केली. ही घटना चाकणमधील पानसरे मळा येथे १५ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अक्षय आनंदा मदने (वय २६, रा. पानसरे मळा, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी यांच्या मुलीसोबत आरोपी अक्षयचा १ फेब्रुवारी २०२४ रोजी विवाह झाला होता. आरोपी अक्षयने वेगवेगळ्या कारणांवरून फिर्यादी यांच्या मुलीसोबत भांडण केले.

तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने १५ एप्रिल रोजी बाथरूममधील ॲसिड पिऊन आत्महत्या केली.

Web Title: Pimpri Chinchwad news Tired of torture wife commits suicide by drinking acid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.