निगडी-चाकण मेट्रो मार्गात उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर काढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:52 IST2025-09-02T14:51:01+5:302025-09-02T14:52:54+5:30

- लोकप्रतिनिधींची मागणी : भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्प अहवालावर बैठक आणि चर्चा

Pimpri Chinchwad news If the flyover is an obstacle on the Nigdi-Chakan metro route remove it | निगडी-चाकण मेट्रो मार्गात उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर काढा

निगडी-चाकण मेट्रो मार्गात उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर काढा

पिंपरी : निगडी ते चाकण मेट्रो मार्ग नाशिक फाटा-भोसरी अशी करा. त्यात भोसरीतील सध्याचा उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्या आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करा. भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोईस्कर असावी, ⁠मेट्रो स्टेशनच्या जवळपास पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, या विषयांवर मेट्रो कार्यालयात चर्चा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सोमवारी (दि.१) सादर करण्यात आला. यानंतर शहरातील लोकप्रतिनिधी व पुणे महा मेट्रोच्या अधिकाऱ्यासमवेत फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त शेखर सिंह, एनएचआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापू गायकवाड, सुनील पवार, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगर सदस्य राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, सचिन चिखले उपस्थित होते.
 

आठ दिवसांत पाहणी करून सर्वेक्षण अहवाल देऊ : हर्डीकर

या बैठकीत भक्ती शक्ती चौक–मुकाई चौक, किवळे– भुजबळ चौक, वाकड- साई चौक, जगताप डेअरी – कोकणे चौक, नाशिक फाटा – संत तुकारामनगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रिक सेंटर, गोडाऊन चौक – चाकण या महत्त्वाच्या मार्गांच्या प्रकल्प अहवालावर चर्चा करण्यात आली, तसेच त्यासाठी सर्व्हे आणि डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांत पाहणी करून सर्वेक्षण व अहवाल तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: Pimpri Chinchwad news If the flyover is an obstacle on the Nigdi-Chakan metro route remove it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.