बहिणीला आधार दिल्याच्या रागातून दाजीकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:59 IST2026-03-01T17:58:09+5:302026-03-01T17:59:36+5:30
- या कारणावरून चिडलेल्या समाधान याने महिलेला लोखंडी रॉडने दोन्ही पायांवर मारहाण केली

बहिणीला आधार दिल्याच्या रागातून दाजीकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला
पिंपरी : बहिणीला आणि तिच्या मुलाला आधार का दिला, या कारणावरून बहिणीच्या पतीने महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला करून पायाचे हाड फॅक्चर केले, तसेच तिचा मोबाइल व गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्रही चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) सकाळी पावणेआठच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावरील मोशी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिलेने शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समाधान रामराव सोनूने (वय ३५, रा.पिंपळनेर, ता.लोणार, जि.बुलढाणा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेने आपली बहीण व तिचा मुलगा यांना आपल्या घरी राहण्यास आश्रय दिला. या कारणावरून चिडलेल्या समाधान याने महिलेला लोखंडी रॉडने दोन्ही पायांवर मारहाण केली, तसेच महिलेच्या हातातील मोबाइल व गळ्यातील दोन ग्रॅमचे मणी मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले.