देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:08 IST2025-08-11T15:07:50+5:302025-08-11T15:08:12+5:30

भीषण अपघातात 28 ते 30 महिला जखमी झाल्या असून ८ ते १० महिला सिरीयस असल्याचे सांगण्यात आले आहे

Pickup going for Devdarshan falls into 100 to 150 feet ravine; 30 women injured, incident in Khed taluka | देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

पाईट : श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअपमधील  २८ ते ३० महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी आठ ते दहा महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने तातडीने हलवण्यात आले आहे. या अपघातात ती महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
पाईट ता खेड परिसरातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या महिलांचा पिकअप गाडी हीकुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर घाट चढत होती. पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्या आहेत. गाडीमध्ये अक्षरशा रक्ताचा खच साचला होता. असून त्यातील आठ ते दहा महिला अत्यावस्थ असून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Pickup going for Devdarshan falls into 100 to 150 feet ravine; 30 women injured, incident in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.