पिकअप आणि कारची धडक; कारचा पुढील भाग चक्काचूर, चालकाचा मृत्यू, कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:46 IST2026-03-18T18:45:55+5:302026-03-18T18:46:30+5:30

कारचालकाचा मृत्यू झाला तर पिकअप चालकाने वाहनातून उडी मारून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली

Pickup and car collide; front part of car smashed, driver dies, incident on Kalyan-Ahilyanagar highway | पिकअप आणि कारची धडक; कारचा पुढील भाग चक्काचूर, चालकाचा मृत्यू, कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील घटना

पिकअप आणि कारची धडक; कारचा पुढील भाग चक्काचूर, चालकाचा मृत्यू, कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील घटना

ओतूर : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ओतूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पिकअप व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली असून अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ओतूरकडून आळेफाटाकडे जाणारी पिकअप आणि आळेफाटाकडून ओतूरकडे येणारी कार यांच्यात पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.

या अपघातात कार चालक अनिकेत (मयूर) नामदेव पानसरे वय ३२ (रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने वाहनातून उडी मारून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामसुंदर जायभाये, राजेंद्र आमले, सुभाष केदारी तसेच होमगार्ड संदीप शिंदे, चैतन्य जाधव आणि प्रवीण भोर यांनी कारवाईत सहभाग घेतला. ओतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या महामार्गावर वेगमर्यादा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कडक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे ओतूरसह माळशेज पट्ट्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : कल्याण-अहिल्या नगर राजमार्ग पर पिकअप और कार की टक्कर: चालक की मौत

Web Summary : कल्याण-अहिल्या नगर राजमार्ग पर पिंपरी पेंढार गांव के पास एक भीषण दुर्घटना में एक युवक की मौत हो गई। एक पिकअप ट्रक और कार की आमने-सामने टक्कर हो गई। कार बुरी तरह क्षतिग्रस्त हो गई, और पिकअप चालक फरार हो गया। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Pickup-Car Collision on Kalyan-Ahlilyanagar Highway: Driver Dies, Car Destroyed

Web Summary : A fatal accident on the Kalyan-Ahlilyanagar highway claimed a young man's life. A pickup truck collided head-on with a car near Pimpri Pendhar. The car was severely damaged, and the pickup driver fled. Police are investigating the incident.