शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून सासूकडून शारीरिक, मानसिक छळ; उच्चशिक्षित महिलेचे टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:35 IST

लग्नानंतर ८ वर्षांनी सासू सासूने विवाहितेला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली

पुणे: हुंड्यासाठी सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील हांडेवाडी भागात घडली. याप्रकरणी सासूविरोधात काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका प्रमोद जाधव (२९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासू द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि प्रमोद जाधव यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दीपिकाने कृषीविषयक पदवी मिळवली आहे. लग्नानंतर ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा पती शासकीय कार्यालयात लिपिक आहे. त्यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर सासू द्वारका हिने दीपिकाला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यात आले. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. छळ असह्य झाल्याने दीपिकाने शुक्रवारी (दि. २०) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नMONEYपैसाDeathमृत्यूWomenमहिलाPoliceपोलिसHadapsarहडपसर