शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे ‘ते’ टँकर भरवस्तीतच उभे

By admin | Updated: October 12, 2015 01:31 IST

येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ अवैध पेट्रोल, डिझेलच्या धंद्यावर धाड टाकून पेट्रोल व डिझेलचे जप्त केलेले टँकर आजही भरवस्तीत उभे आहेत

लोणी काळभोर : येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ अवैध पेट्रोल, डिझेलच्या धंद्यावर धाड टाकून पेट्रोल व डिझेलचे जप्त केलेले टँकर आजही भरवस्तीत उभे आहेत. त्यातून गळीत होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.दि. ३ आॅक्टोबर रोजी पुरवठा विभागाने छापा टाकून चार टँकर, एक पिकअप जीपसह ४१ लाख ४१ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. नऊ जणांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले चारही टँकर सील करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. जागा उपलब्ध नसल्याने ते भरवस्तीतच उभे करण्यात आले आहेत. टँकरच्या (एमएच/ ०४/ सीए/ ५६१८) वॉल्व्हमधून पेट्रोलियम पदार्थाची गळती होत आहे. बादली व कॅन्डमध्ये हा ज्वालाग्राही पदार्र्थ जमा केला जात आहे. तो कधीही पेट घेऊ शकतो. तसे झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्याशी संपर्क साधला असता, उघड्यावर टँकर ठेवणे धोकादायक आहे. आम्ही याबाबत ६ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून टँकर सुरक्षित ठिकाणी हलवावेत किंवा त्याची विल्हेवाट लावावी. यासाठी योग्य ते आदेश व्हावेत, असा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. (वार्ताहर)