पुण्यात पेट्रोल 120 च्या घरात; 14 दिवसांत तब्बल 10 रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 06:53 PM2022-04-05T18:53:36+5:302022-04-05T18:57:55+5:30

गेल्या 14 दिवसांत पेट्रोलचे डिझेलचे दर जवळपास 10 रुपयांनी वाढले आहेत...

petrol prices in pune 120 rupees per litre in pune know the diesel cng prices | पुण्यात पेट्रोल 120 च्या घरात; 14 दिवसांत तब्बल 10 रुपयांची वाढ

पुण्यात पेट्रोल 120 च्या घरात; 14 दिवसांत तब्बल 10 रुपयांची वाढ

Next

पुणे: मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वारंवार वाढ होत आहे. गेल्या 14 दिवसांत पेट्रोलचेडिझेलचे दर जवळपास 10 रुपयांनी वाढले आहेत. आजचे शहरातील पेट्रोलचे प्रतिलिटर दर  119.13 रुपये झाले आहेत. तर डिझेलचे प्रतिलिटर दर 101.84 रुपयांवर पोचले आहेत. (price of petrol, Diesel in Pune)

शहरात पावर पेट्रोलचे दर 123.63 प्रतिलिटर झाले आहेत. तर सीएनजीचे प्रतिकिलो दर 62.20 वर गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने सामान्यांच्या खिश्यावर ताण पडत आहे.

सोमवारी शहरात पेट्रोल 118.29 तर पावर पेट्रोल 122.79 प्रतिलिटर होते. तर कालचे डिझेलचे दर 101.01 प्रतिलिटर होते. सीएनजीचे दर 62.20 प्रतिकिलो होते.

Web Title: petrol prices in pune 120 rupees per litre in pune know the diesel cng prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.