Video: तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:16 IST2026-02-11T11:14:49+5:302026-02-11T11:16:32+5:30

घटनेमागील कारण स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो रागाच्या भरात वाढत गेला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

People swinging swords and throwing stones at each other; Terror, atmosphere of fear among citizens in Lohianagar area of Pune | Video: तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video: तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे : पुण्यातील लोहियानगर परिसरात रविवारी रात्री काही युवकांनी हातात तलवारी घेऊन दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने वायरल झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओमध्ये काही युवक तलवारी फिरवत असल्याचे आणि एकमेकांवर दगडफेक करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अचानक झालेल्या या गोंधळामुळे स्थानिकांनी पोलिसांना माहिती देत मदत मागितली.

घटनेमागील कारण स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो रागाच्या भरात वाढत गेला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वायरल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणात कोण सहभागी होते आणि तलवारी कुठून आणल्या याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Web Title : पुणे: लोहियानगर में तलवारें और पत्थर, निवासियों में दहशत

Web Summary : पुणे के लोहियानगर में युवकों ने तलवारें लहराकर दहशत फैलाई, पत्थरबाजी की। पुलिस ने हस्तक्षेप कर जांच शुरू कर दी है और शांति बनाए रखने की अपील की है। कारण अज्ञात है।

Web Title : Pune: Swords and Stones Spark Fear in Lohianagar; Tension Grips Residents

Web Summary : Youths wielding swords terrorized Pune's Lohianagar, leading to stone-pelting. Police responded, investigating the incident and appealing for calm. The cause is under investigation.