शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जेधे चौकात पादचारी उपरे

By admin | Updated: September 14, 2015 04:49 IST

शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात पादचारी उपरे ठरत आहेत. उड्डाणपुलांच्या कामांमुळे अरुंद झालेल्या चौकात पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे

पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात पादचारी उपरे ठरत आहेत. उड्डाणपुलांच्या कामांमुळे अरुंद झालेल्या चौकात पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे. पादचाऱ्यांना चौक ओलांडण्यासाठी असलेले १५ सेकंदही वाहने घुसखोरीमुळे अपुरे पडत आहेत. सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्ता... या चार प्रमुख रस्त्यांना जोडणारा जेधे चौक. एसटी तसेच पीएमपीच्या महत्त्वाच्या बसस्थानकांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने या चौकाला आगळे महत्त्व आहे. याचबरोबर शहर मध्यवस्तीतील महत्त्वाचा चौक असल्याने सामान्य नागरिकांचीही सततची ये-जा असते. परिणामी वाहनांबरोबरच पादचाऱ्यांचाही कमालीचा बोजा पडत असतो. कोंडी फोडण्यासाठी नियोजन गरजेचे आहे. आठवडाभर येथील स्थितीचा लोकमत प्रतिनिधीने प्रत्यक्ष आढावा घेतला. सातारा रस्ता, टिळक व शिवाजी रस्त्याकडून सारसबाग रस्त्याकडे वळणाऱ्या वाहनांवर तर कसलेच नियंत्रण नाही. या रस्त्यांवरून वाहनांंची वर्दळ सातत्याने असते. त्यातच सातारा रस्त्याकडून वळणाऱ्या वाहनांना तीन व सहाआसनी रिक्षांना वळसा घालून पुढे जावे लागत आहे. या रिक्षा कशाही उभ्या केल्याने कोंडी अधिकच होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चौकात जाण्यापूर्वी रिक्षा व इतर वाहनांचा सामना करावा लागत आहे. पादचाऱ्यांच्या सिग्नलवरही अतिक्रमण जेधे चौकात पादचाऱ्यांना चौक पार करण्यासाठी साधारण १५ सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र, या वेळेतही वाहनचालकांनी अतिक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. पादचाऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही वाहनचालकांची घुसखोरी सुरूच असते. तसेच पादचाऱ्यांना रेड सिग्नल मिळण्यापूर्वीच एका बाजूने वाहनचालक भरधावपणे वाहने दामटतात. यात ४-५ सेकंद सहजपणे निघून जातात. त्यामुळे अनेकदा वाहनांशी स्पर्धा करत पादचाऱ्यांना चौक ओलांडावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या कामात पादचारी दुर्लक्षित चौकालगत सोलापूर रस्ता व सातारा रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू करताना पादचाऱ्यांचा कसलाही विचार करण्यात आलेला नाही. नेमका चौक ओलांडायचा कसा, हा प्रश्न पादचाऱ्यांसमोर असतो. अनेक वाहनचालक सिग्नल असलेल्या ठिकाणापासून पुढे वाहन उभे करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मध्य भागातूनच चौक पार करावा लागत आहे. पादचाऱ्यांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.