शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोनशे मंडळांची मिरवणूक रंगली शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 01:25 IST

डीजेचा वापर जास्त असल्याने बहुतांश मंडळांनी सायंकाळी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतल्याने टिळक रस्त्यावरील मिरवणूक रेंगाळली.

पुणे : डीजेचा वापर जास्त असल्याने बहुतांश मंडळांनी सायंकाळी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतल्याने टिळक रस्त्यावरील मिरवणूक रेंगाळली. गुरुवारी रात्री बारापर्यंत केवळ १५ मंडळांचे रथ टिळक रस्त्यावरून विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. त्यानंतर तब्बल १८१ मंडळे शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत सहभागी झाली. सकाळी नऊ वाजल्यानंतर पोलिसांनी मिरवणुका पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे विसर्जनाचा कालावधी कमी झाला. टिळक रस्त्यावरील बहुतेक मंडळे डीजे व विद्युतरोषणाईची असल्याने या रस्त्यावरील मिरवणूक सुरू व्हायलाच दुपार उजाडली. घोरपडे पेठेतील कैकाडी समाज तरूण मंडळ दुपारी पाऊणच्या सुमारास स. प. महाविद्यालयाजवळ आला. त्यापाठोपाठ १.२५ वाजता पर्वती पायथा येथील आझाद मित्र मंडळाची दोन ढोलताशा पथके असलेली मिरवणूक आली. त्यानंंतर तब्बल अडीच तासांनी सार्वजनिक चिंचेची तालीम मंडळाच्या रथाचे आगमन झाले. त्यापाठोपाठ चार वाजता हत्ती गणपती मंडळाचा कमल रथ आला. शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ हलता देखावा रथाच्या पुढे होता. त्यापुढे दोन ढोलताशा पथकांचे वादन सुरू होते. जवळपास पाऊण तास हे वादन सुरू होते. त्यानंतर प्रत्येक मंडळात जवळपास अर्ध्या तासाचे अंतर पडत गेले.रात्री बारापर्यंत ग्राहक पेठ, शिवदर्शन मित्रमंडळ, श्रीचिमण्या गणपती मंडळ, टिळक रोड गणेशोत्सव मंडळ यांसह केवळ २१ मंडळे स.प. महाविद्यालयासमोरून पुढे गेली होती. तर केवळ १५ मंडळांची मिरवणूक टिळक रस्ता पार करून विसर्जनासाठी मार्गस्थ झाली होती. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून टिळक रस्त्यावरील मिरवणुकीत १९६ मंडळांनी सहभागी घेतला. याचा अर्थ रात्री बारा वाजेपर्यंतची १५ मंडळे सोडल्यास तब्बल १८१ मंडळांची मिरवणूक केवळ १३ ते १४ तास चालली. दिवसभर पोलिसांकडून मंडळांना मिरवणुकीत पुढे सरकण्यासाठी कोणतीही सक्ती केली जात नव्हती. त्यामुळे ढोल-ताशा पथकांसह डीजे असलेली मंडळे हवा तेवढा वेळ एका जागेवर थांबून राहात होती. रात्री बारानंतर डीजे बंद झाल्यानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत केवळ १८ मंडळे शांतपणे स. प. महाविद्यालयासमोरून पुढे गेली. सहा वाजल्यानंतर एकाच वेळी बहुतेक सर्वच मंडळाचे डीजे सुरू झाला. त्यानंतर मात्र एकामागोमाग एक मंडळ पुढे सरकू लागले. शुक्रवारी दुपारी १.१० वाजता अंकुश मित्र मंडळ महाविद्यालयासमोरून गेले.