कामगार दिनीच रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या ऍड. वैशाली चांदणेंसह जहांगीरच्या कामगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 06:41 PM2019-05-01T18:41:42+5:302019-05-01T18:41:58+5:30

थकलेली पगारवाढ, मिळत नसलेला बोनस, कायमस्वरूपी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचारासाठी नकार, पगारी सुट्ट्या नाकारणे आशा अनेक कारणांमुळे जहांगीर हॉस्पिटलचे कर्मचारी त्रस्त आहेत. 

patient' Rights Council leader Adv. Vaishali Chandane & Jahangir workers arrested | कामगार दिनीच रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या ऍड. वैशाली चांदणेंसह जहांगीरच्या कामगारांना अटक

कामगार दिनीच रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या ऍड. वैशाली चांदणेंसह जहांगीरच्या कामगारांना अटक

Next

पुणे - गेल्या १४ महिन्यापासून जहांगीर हॉस्पिटलमध्ये कामगारांचे शोषण आणि पिळवणूक होत आहे. थकलेली पगारवाढ, मिळत नसलेला बोनस, कायमस्वरूपी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचारासाठी नकार, पगारी सुट्ट्या नाकारणे आशा अनेक कारणांमुळे जहांगीर हॉस्पिटलचे कर्मचारी त्रस्त आहेत.  आणि याच कारणामुळे कर्मचाऱ्यांना आज कामगारांच्या हक्काच्या दिनीच आज हॉस्पिटलसमोर आंदोलन करावे लागले. 

रूग्ण हक्क परिषद हॉस्पिटल कर्मचारी आघाडीच्या वतीने आज कामगार दिनाच्या दिवशीच हजारो कर्मचारी आंदोलनाला उपस्थित राहिले, आणि रूग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक नेत्या ऍड वैशाली चांदणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण, कर्मचारी आघाडी च्या मनीषा धिवार, विद्या रणदिवे, पुणे शहर अध्यक्ष दत्ता सुरते, शहर कार्याध्यक्ष तेजश्री पवार, पुणे शहर उपाध्यक्ष अकबर मुलाणी, श्याम डिसुझा, सुप्रिया माने, सम्पर्कप्रमुख प्रशांत गायकवाड, सचिव समीर वाव्हळे, सरचिटणीस विक्रांत भोसले, सदस्य सोनाली बढे, मुमताज अली अन्सारी, अविनाश फंड, नितीन पवार यांच्यासह हजारो कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

 ऍड वैशाली चांदणे, प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण, मनीषा धिवार, विद्या रणदिवे यांच्याशी चर्चा करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाने प्रयत्न केला. मात्र लेखी मागण्या मान्य न केल्याने आंदोलन सुरूच ठेवल्याने ऍड वैशाली चांदणे यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत रूग्ण हक्क परिषदेने तीव्र निषेध नोंदवला आहे.

Web Title: patient' Rights Council leader Adv. Vaishali Chandane & Jahangir workers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे