शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टची माहिती लपविणे महागात

By admin | Updated: August 19, 2015 00:19 IST

पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना सध्याचा राहता पत्ता न देता फक्त गावाकडचा पत्ता देणे, गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती न देणे, पूर्वी

दीपक जाधव, पुणेपुणे : पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना सध्याचा राहता पत्ता न देता फक्त गावाकडचा पत्ता देणे, गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती न देणे, पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केलेला असतानाही त्याची माहिती न भरणे अशा विविध प्रकारे माहिती लपविणे अर्जदारांना चांगलेच महागात पडत आहे. माहिती लपविणाऱ्या अर्जदारांकडून दररोज सरासरी ७० हजार ते एक लाखापर्यंतचा दंड वसूल केला जात आहे.पुणे पासपोर्ट विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या ६ जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विभागाकडे पासपोर्टसाठी दररोज आॅनलाइन दीड हजार अर्ज येतात. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळून आल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केलेली आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या चाळण्या लावून अर्जात भरलेली माहिती तपासून पाहिली जाते. त्यामुळे चुकीची माहिती भरल्याचे किंवा माहिती लपविल्याचे लगेच स्पष्ट होत आहे.माहिती लपविणाऱ्या या अर्जदारांना ५ हजार रुपये दंड आकारला जातो. पासपोर्ट हा नागरिकत्वाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा असल्याने अर्जदारांकडून पासपोर्ट कार्यालयाची दिशाभूल होऊ नये, म्हणून ही कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये चुकीची माहिती भरल्याप्रकरणी २० कोटीपेक्षा जास्त रकमेचा दंड पासपोर्ट कार्यालयाकडे जमा झाला आहे.आॅनलाइन अर्ज भरताना पोलीस व्हेरिफिकेशन टाळण्यासाठी सध्याचा पत्ता न देता केवळ कायमस्वरूपी पत्ता देण्याचे प्रमाण मोठे आहे. अर्जदारांवर गुन्हे दाखल नसतानाही केवळ दोन-दोन ठिकाणचे पोलीस व्हेरिफिकेशन टाळण्यासाठी एकच पत्ता दिला जातो. मात्र पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया आता गतिमान करण्यात आल्याने त्याचा कालावधी खूपच कमी झाला आहे.पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज भरलेला असतानाही त्याची माहिती न देता दुसरा अर्ज भरला जातो. पासपोर्ट कार्यालयाने अर्जाबाबत काही आक्षेप घेऊन पासपोर्ट वितरीत न केल्यास पुन्हा नव्याने अर्ज भरून पासपोर्ट भरण्याचा प्रयत्न अर्जदारांकडून केला जातो. आॅनलाइन पद्धतीमुळे हा प्रकार लगेच उजेडात येतो. त्यामुळे अर्जदारांनी नवीन अर्ज न भरता जुन्या अर्जातील आक्षेप दूर करून पासपोर्ट मिळविणे सोयीस्कर ठरू शकणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर अर्ज कसा भरावा, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मात्र ती न वाचताच अर्ज भरल्याने अनेकदा चुका असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोज ४० ते ५० जणांवर कारवाई...माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यानंतर अर्जदाराकडून खुलासा मागविला जातो. समाधानकारक खुलासा न केल्यास त्याला ५ हजार रुपये दंड आकारला जातो. विद्यार्थ्यांना ५०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे दररोज ४० ते ५० जणांकडून दंडवसुली केली जात आहे.