तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:30 IST2026-02-19T12:29:49+5:302026-02-19T12:30:02+5:30

लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.

Passengers wait 2 hours at Pune railway station for tickets; huge crowd, inconvenience due to fewer ticket windows | तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय

तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय

पुणे : पुणेरेल्वे स्थानकावर बुधवारी (दि.१८) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास तिकीट खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्थानकाच्या आतील बाजूस दोन आणि मेन गेटच्या बाजूस दोन, अशा एकूण चार तिकीट खिडक्या सुरू होत्या. मात्र, प्रवाशांची संख्या जास्त असल्याने तिकीट घेण्यासाठी नागरिकांना तब्बल दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत होते. उर्वरित तिकीट खिडक्या बंद असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या दीड ते दोन लाख आहे. यामुळे स्थानकावर कायम प्रवाशांची वर्दळ असते. दरम्यान, आरक्षण तिकीट काढणाऱ्यांची संख्या जास्त असते. याशिवाय ऐनवेळी जाणाऱ्यांनी जनरल तिकीट काढतात. पुणे स्थानकावर आतील बाजूस तीन तिकीट खिडक्या आहेत. तर मुख्य गेटच्या शेजारी तीन आणि ताडीवाला रोडच्या बाजूस एक असे एकूण सात तिकीट खिडक्या आहेत. तर २० व्हेंडिंग मशीन आहे. परंतु, दुपारी काही व्हेंडिंग मशीन बंद होते. त्यामुळे तिकीट खिडकीवर गर्दी झाली होती. त्यात चारच खिडक्या चालू असल्याने प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, तसेच काही प्रवासी तिकीट काढण्यासाठी मध्ये घुसल्याने गोंधळ सुरू होता. अशा वेळी गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजचे आहे. शिवाय दुपारनंतर अनेक प्रवासी कामानिमित्त, शैक्षणिक कारणांसाठी, तसेच गावी जाण्यासाठी गर्दी करतात. काही गाड्यांच्या सुटण्याची वेळ जवळ आल्याने प्रवाशांमध्ये गडबड होते. लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.

Web Title : पुणे रेलवे स्टेशन: टिकटों के लिए यात्रियों का 2 घंटे इंतजार, भारी भीड़।

Web Summary : पुणे रेलवे स्टेशन पर टिकट काउंटरों पर भारी भीड़ से यात्रियों को काफी असुविधा हुई। सीमित खुले काउंटरों और खराब वेंडिंग मशीनों के कारण यात्रियों को दो घंटे तक इंतजार करना पड़ा, जिससे वरिष्ठ नागरिकों और परिवारों को विशेष रूप से परेशानी हुई।

Web Title : Pune Railway Station: Passengers wait 2 hours for tickets amid rush.

Web Summary : A huge rush at Pune Railway Station's ticket counters caused significant inconvenience. Passengers waited up to two hours due to limited open counters and malfunctioning vending machines, especially affecting senior citizens and families.