पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:56 IST2025-11-07T18:55:15+5:302025-11-07T18:56:30+5:30
Parth Pawar Land Deal Ajit Pawar: पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जागेचा व्यवहार वादात सापडला. सरकारने याची चौकशी लावली असून, हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे.

पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
Ajit pawar on Parth Pawar land case: "मी आधीच सांगितलं आहे की, मला या व्यवहाराबद्दल माहिती नव्हतं. याची चर्चा सुरू झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना कॉल केला होता. त्यांना सांगितलं की, तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला चौकशी करायची असेल, समिती नेमायची असेल; त्या सगळ्या गोष्टींना माझा पाठिंबा आहे", असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणात एका पैशाचाही व्यवहार झालेला नव्हता, असा खुलासाही त्यांनी केला.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "मी आधीच स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी आजपर्यंतच्या जीवनात नियम सोडून काम केलेलं नाही. माझ्यावर आधी आरोप झाले, त्यात अनियमितता होती. पण, काही सिद्ध झाले नाही", असे सिंचन घोटाळ्याबद्दल बोलले."
"मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कॉल केला"
"या व्यवहाराबद्दल मला अजिबात काही माहिती नव्हतं. माहिती असतं, तर मी सांगितलं असतं की, मला माहिती आहे. या व्यवहाराबद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यावेळी आपले मुख्यमंत्री नागपूरला होते. त्यावेळी मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला. मी त्यांना सांगितलं की, जरी माझ्या घरच्यांशी संबंधित असणारा हा विषय असला, तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. तु्म्हाला जे काही नियमाप्रमाणे करावे लागेल, चौकशी करायची असेल. माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील", अशी माहिती अजित पवारांनी दिली.
व्यवहार रद्द झाला आहे, अजित पवारांनी दिली माहिती
"आरोप करणं सोप्पं असतं. पण, आरोपातील तथ्य जनतेला कळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. याबद्दलची माहिती घेतल्यानंतर या व्यवहारात एक रुपयाही दिला गेला नाहीये. तरी मोठंमोठे आकडे सांगितले गेले. विरोधकांनीही आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच आहे विरोधकांचा तो अधिकार आहे", असेही अजित पवार म्हणाले.
"मला आज संध्याकाळी कळालं की, या व्यवहाराबद्दल जे कागदपत्रे झाली होती, ती रद्द करण्यात आली आहे. जो व्यवहार झाला होता, तो रद्द करण्यात आला आहे", अशी माहिती अजित पवार यांनी दिली.