शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना दिलासा : शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून होणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 18:02 IST

गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली केली जाणार आहेत. पालिका याबाबतचे आदेश काढणार असून नागरिकांना ताळेबंदी उठविण्याच्या प्रक्रियेत आणखी एक दिलासा मिळाला आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 'लॉकडाऊन' घोषित करण्यात आला होता. त्यानंतर, राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेनेही संपूर्ण टाळेबंदी केली होती. कोरोना रूग्णांची संख्या आता घटू लागली असून शहरातील परिस्थिती आटोक्यात येऊ लागली आहे. यापूर्वीच महापालिकेने दुकाने, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट, ग्रंथालये, विपश्यना केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मागील आठवड्यात हॉटेल्स आणि बार-रेस्टॉरंट यांना रात्री साडे अकरापर्यंत परवानगी दिली आहे. शहरातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने आता उद्याने सुरू करण्याची मागणी होत आहे. ही उद्याने सुरू करण्याबाबत पालिका सकारात्मक असून याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

 नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी तसेच लहान मुलांसह सर्वानाच उद्यानात जाता यावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. परवानगी देण्यात आली असली तरी अटी आणि शर्तींच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत. ------ गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरु करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्याने उद्यानात पुणेकरांनी योग्य काळजी घ्यावी. - मुरलीधर मोहोळ, महापौर

टॅग्स :Puneपुणेkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या