पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:22 IST2026-01-27T15:20:29+5:302026-01-27T15:22:48+5:30

मोतीबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असून, संघाच्या कार्यालयास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेट देतात, तसेच त्यांचे याठिकाणी वास्तव्य असते

Parking of vehicles is prohibited in the 'Motibagh' area of Pune's Shaniwar Peth; What is the real reason? | पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई; नेमकं कारण काय?

पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई; नेमकं कारण काय?

पुणे : आता शनिवार पेठेतील ' मोतीबाग' परिसरात पुणेकरांना वाहने लावता येणार नाहीत. या परिसरात विश्वलिला इमारत ते मोतीबागपर्यंत दहा मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.

मोतीबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असून, संघाच्या कार्यालयास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेट देतात, तसेच तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे वास्तव्य असते. मोतीबाग परिसरातील अरुंद गल्लीत दुचाकी वाहने लावण्यात येतात. या परिसरात अहिल्यादेवी प्रशाला आहे. अरुंद गल्लीत दुचाकी, तसेच चारचाकी वाहने लावण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा होत होता. त्यामुळे मोतीबागेतील नाट्यछटाकार दिवाकर रस्त्यावरील हाॅटेल रामकृष्ण ते मोतीबाग दरम्यान दहा मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक शाखा कार्यालय, गोल्फ क्लब रस्ता (लोहगाव विमानतळ रस्ता), बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कार्यालय येथे ९ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पोलीस उपायुक्त जाधव यांनी कळवले आहे.

Web Title : पुणे के मोतीबाग इलाके में वाहन प्रतिबंधित: जानिए क्यों

Web Summary : पुणे के मोतीबाग में आरएसएस कार्यालय में आने वाले वीआईपी की सुरक्षा चिंताओं के कारण वाहनों पर प्रतिबंध लगा दिया गया है। पुलिस द्वारा लगाए गए इस प्रतिबंध का उद्देश्य संकरी सड़क पर खड़े वाहनों के कारण होने वाले यातायात की भीड़ को कम करना है। आपत्तियां 9 फरवरी तक जमा की जा सकती हैं।

Web Title : Vehicle Ban in Pune's Motibag Area: Here's Why

Web Summary : Vehicles are now banned near Motibag in Pune due to security concerns for visiting VIPs at the RSS office. The ban, imposed by police, addresses traffic congestion caused by parked vehicles in the narrow street. Objections can be submitted until February 9th.