Panshet Dam : राजस्थानहून पुण्यात फिरायला आलेला चिमुकला पानशेत धरणात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:20 IST2025-06-13T15:19:15+5:302025-06-13T15:20:34+5:30

- सोहनलाल हा मूळचा राजस्थान येथील पाली तहसीलचा असून या घटनेमुळे घरच्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Panshet Dam: A toddler who came to Pune from Rajasthan for a walk drowned in Panshet Dam | Panshet Dam : राजस्थानहून पुण्यात फिरायला आलेला चिमुकला पानशेत धरणात बुडाला

Panshet Dam : राजस्थानहून पुण्यात फिरायला आलेला चिमुकला पानशेत धरणात बुडाला

वेल्हे - पानशेत धरणात तेरा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तो मूळचा राजस्थानचा असून गेला काही दिवसांपूर्वी पुण्यातील नातेवाईकांकडे सुट्टी करता आला होता. मात्र आज सकाळी पानशेत धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला

अधिकच्या माहितीनुसार,या मुलाचे नाव सोहनलाल लखमाराम रायिका (वय १३) आहे. आज सकाळी पानशेत धरणावर अंघोळीसाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कालव्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.सोहनलाल हा  मूळचा राजस्थान येथील पाली तहसीलचा असून या घटनेमुळे घरच्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच हवेली व वेल्हे आपत्ती व्यवस्थापन टीमकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. काही तासांच्या शोध कार्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Panshet Dam: A toddler who came to Pune from Rajasthan for a walk drowned in Panshet Dam