शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पानशेत वसाहतीत आली वीज!

By admin | Updated: January 6, 2015 23:01 IST

वेल्हे तालुक्यातील पानशेत वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी वीजनिर्मिती बंद पाडल्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाने थकबाकी भरण्याची हमी घेतली

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पानशेत वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी वीजनिर्मिती बंद पाडल्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाने थकबाकी भरण्याची हमी घेतली व गेल्या २८ नोव्हेंबरपासून बंद असलेला वसाहतीचा वीजपुरवठा सुरु झाला़ वसाहतीमधील वीजेचे थकबाकी १ कोटी ६७ लाख रुपयांवर गेल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपूर्वी महावितरणने वसाहतीचा वीजपुरवठा खंडीत केला होता़ त्यामुळे या वसाहतीला नववर्षाचे स्वागतही अंधारात करावे लागले होते़ या परिसरात पानशेत, वरसगाव, खडकवासला या धरणांवर काम करणारे कर्मचारी, शासकीय कार्यालये, कर्मचारी निवासस्थाने, बँका, विद्यार्थी वसतिगृहे, शाळा, पानशेत धरणग्रस्त इत्यादींना विजेअभावी विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. लोकमतने याबाबत ‘पानशेत वसाहतीतील बत्ती गूल ’ असे वृत्त झापून ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या होत्या. या वेळी वीजपुरवठा पूर्ववत करा; अन्यथा जलसमाधी घेऊ, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही. अखेर सोमवारी येथील ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनासाठी जमा झाले व त्यांनी आंदोलनास प्रारंभ केला. यामध्ये दोन हजार महिलांचा सहभाग होता. दुपारी एक वाजता आंदोलकांनी धरणाच्या सांडव्यावर जाऊन पाणी बंद केले. सुमारे दीड तास वीजनिर्मिती बंद पाडली. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. वीजपुरवठा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य गणपत गायकवाड, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस रमेश शिर्के, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान बांदल, युवक अध्यक्ष किरण राऊत, कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक भगवानराव पासलकर, पंचायत समिती सदस्य राजेश निवंगुणे, सरपंच आशा पासलकर, अंकुश पासलकर, ज्योती कडू, अरुण शिर्के, वंदना निवंगुणे, बाळासाहेब कोंडेकर, माजी सभापती निर्मला जागडे, राजेंद्र ठाकर, परिसरातील धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. वसाहतीमधील १ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. येत्या २० जानेवारीला २३ लाख रुपये भरण्याची हमी खडकवासला पाटबंधारे विभागाने दिल्याने वीजपुरवठा सुरू होणार आहे.