नीरा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५५ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराजांचा व पंढरपूरच्या पाडुरंगाचा पायी पालखी सोहळा आळंदीकडे चालला आहे. पंढरपूरहून (कार्तिक शु १५) दि.०५ नोव्हेंबर रोजी प्रस्थापन झालेल्या नामदेव महाराजांच्या व पांडुरंगाच्या पालखीचे रविवारी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नीरा (ता.पुरंदर) येथे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी अकरा वाजता संत नामदेवांच्या तर साडेअकराच्या सुमारास पांडुरंगाच्या पादुकांंना नीरा नदीतील दत्त घाटावर विठ्ठल नामाचा जयघोषात स्नान घालण्यात आले.
२०१४ सालापासून पंढरपूरच्या पाढुरंगाचा पायी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यावर्षी पांडुरंग पालखी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १६ तर रथामागे ३५ दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या यावारीत सहभागी झाले आहेत. साडेपाच हजार वारकरी सोहळ्यात सहभागी झाले असल्याची माहिती सोहळा प्रमुख विठ्ठल (दादा) तात्यासाहेब वासकर यांनी दिली. रविवारी सकाळी पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यातील सुरवडी येथील मुक्काम आटपून लोणंद मार्गे पुणे जिल्ह्याकडे प्रस्थान केले. दुपारच्या विसाव्यानंतर पांडुरंगाचा पालखी सोहळा अडिच वाजता वाल्हे येथे मुक्काम स्थळाकडे रवाना झाला. संत नामदेव महाराजांच्या नीरा स्नानानंतर दत्त मंदिराच्या सभामंडपात नितीन किकले व प्रशांत हेंद्रे यांनी पादुकांना अभिषेक केला. महाआरती नंतर सोहळा नीरेच्या विठ्ठल मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाला.
संत नामदेव महाराजांच्या पालखी सोबत महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, निवृत्ती नामदास, मुरारी नामदास, आदित्य नामदास तसेच पालखीसोबत पन्नास दिंड्या असून किर्तनकार राममहाराज झुंजुरके, बाळू महाराज उखळीकर, बाबा महाराज आजरेकर, सोपानकाका टेंबूकर, प्रमोद महाराज ठाकरे, चोपदार सुरज चव्हाण उपस्थित होते. पालखी सोहळ्याकरिता पंढरपूर पासून आळंदी पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट व पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या कडून पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सोहळा मालक नामदास महाराज यांनी दिली. यानिमित्ताने नीरेतील शिंपी समाज व झांबरे परिवाराच्या वतीने विठ्ठल नामदेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या विसाव्यानंतर आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
Web Summary : Saint Namdev and Panduranga's Palkhi arrived in Purandar for Sant Dnyaneshwar's Sanjeevan Samadhi ceremony. The Palkhi, which started from Pandharpur on November 5th, was welcomed in Neera. Thousands of Warkaris are participating in this annual procession towards Alandi.
Web Summary : संत ज्ञानेश्वर के संजीवन समाधि समारोह के लिए संत नामदेव और पांडुरंगा की पालकी पुरंदर पहुंची। 5 नवंबर को पंढरपुर से शुरू हुई पालकी का नीरा में स्वागत किया गया। इस वार्षिक जुलूस में हजारों वारकरी आलंदी की ओर भाग ले रहे हैं।