शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

तिच्या आरोग्यासाठी झटणारा पुण्यातला पॅडमॅन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 21:07 IST

गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष.

पुणे : भारतीय स्त्रियांचे आरोग्य सुधारायला हवे, त्यांना प्रजनन संस्थेचे आजार होण्यापासून वेळीच रोखणे गरजेचे आहे असे अनेक विचार मांडण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कृती होत नाही तोवर यात बदल होणे अशक्य आहे. गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष.                 मूळ सोलापूरचा असलेल्या सचिनला लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. पण मोठं होऊ मग पैसे मिळवू आणि मग समाजसेवा करू असा विचारही त्याच्या मनात आला नाही. अगदी महाविद्यालयात असताना त्यांनी संपूर्ण राज्यात गाजलेल्या माणुसकीची भिंत हा उपक्रम पहिल्यांदा राबवला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही. आज त्याच्या समाजबंध संस्थेच्यामार्फत त्याचे अनेक उपक्रम सुरु आहेत.

                 याचाच एक भाग म्हणून पुण्याजवळील भोर- वेल्हा भागातील महिलांना संस्थेमार्फत कपड्यांचे वाटप सुरु असताना त्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या समस्येविषयी समजले. त्याचा सविस्तर अभ्यास केल्यावर या महिला वापरत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन म्हणून वापरत असलेल्या पॅडविषयी समजले आणि तो हादरलाच ! अक्षरशः फरशी पुसण्याच्या किंवा पायपुसणी म्हणून वापरायच्या कापडापेक्षाही निकृष्ट दर्जाचा कपडा महिला सॅनिटरी नॅपकिन म्हणून वापरताना त्याला आढळल्या. या प्रश्नावर सचिन आणि त्याची टीम रिसर्च करत होती आणि अचानक त्यांना प्रकाशाचा किरण सापडला. त्यांच्याकडे कपडे वाटण्यासाठी येत असल्यामुळे त्यांनीच पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा विचार केला आणि तयार झाले 'आशा पॅड'.               काही डॉक्टर, तज्ज्ञ यांची मदत घेऊन समाजबंधतर्फे आशा पॅड बनवणे सुरु झाले आहे. हे पॅड बनवण्यापेक्षा महिलांना त्याच्या वापरासाठी तयार करणे अधिक अवघड असते. पण सचिन आणि त्याची टीम यात पूर्ण निपुण झाली असून महिलांना ते अतिशय सहजपणे आशा पॅड वापरण्यास उद्युक्त करतात.आजपर्यंत सुमारे दोन हजार महिलांनी आशा पॅडचा वापर केला आहे. 

                 या प्रकल्पाबद्दल सचिन सांगतो, 'कोणत्याही प्रकारचे पैसे कमावण्याचा हेतू नसल्यामुळे आम्ही विनामूल्य आशा पॅडचे वाटप करतो. मासिक पाळीबद्दल केवळ ग्रामीण नाही तर शहरी स्त्रियांमध्येही अंधश्रद्धा आहे. या काळात आरोग्याची झालेली हेळसांड आयुष्यभराच्या आजारांना आमंत्रण देणारी असते. त्यामुळे अधिकाधिक स्त्रियांमध्ये याबाबतची जनजागृती करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व स्त्रियांना कायमस्वरूपी पॅड वाटणे अशक्य असून या माध्यमातून त्यांच्यात मासिक पाळीच्या काळात काळजी  घेण्याची जाणीव तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत'.आज समाजबंधच्या माध्यमातून इतर महिलांना आणि संस्थांनाही पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. घरातली बाई, आई आणि ताई यांच्या पलीकडे जात आजूबाजूला वावरणाऱ्या आणि कोणतीही ओळख, नातं नसणाऱ्या 'तिच्या' आरोग्याची काळजी वाहणारा सचिन पुण्याचा आधुनिक पॅडमॅन आहे यात शंका नाही.

टॅग्स :Puneपुणेsocial workerसमाजसेवकWomenमहिलाHealthआरोग्य