शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

VIDEO: हिंजवडीतलं OYO हॉटेल, रूम नं 306; 'त्या' रात्री भयंकर घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 3:22 PM

तिच्यासोबत असणारा प्रियकर मात्र गायब होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तपासाची चक्र फिरवली.. आणि समोर आलं भयंकर सत्य....

- किरण शिंदे

पुणे : वंदना द्विवेदी ही २६ वर्षाची तरुणी. मुळची उत्तर प्रदेशच्या लखनऊची. सध्या हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये नोकरीला होती. मात्र २७ जानेवारी हा दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला. या दिवशी ती प्रियकरासोबत हिंजवडीतील एका ओयो हॉटेलमध्ये गेली होती. रात्रभर तिचा तिथेच मुक्काम होता. मात्र सकाळ होताच एक भयंकर प्रकार उघडकीस आला. या ओयो हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वंदनाचा मृतदेह पडला होता. तिच्यासोबत असणारा प्रियकर मात्र गायब होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तपासाची चक्र फिरवली.. आणि समोर आलं भयंकर सत्य.

ऋषभ निगम आणि वंदना हे दोघेही लखनऊ येथील रहिवासी. एकाच परिसरात राहणारे. शाळेपासून दोघांची मैत्री होती. जुनी मैत्री प्रेम संबंधात कधी बदलली त्या दोघांनाही कळले नाही. शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरीसाठी वंदना पुण्यात आली. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कामाला लागली.तर ऋषभ हा लखनौत ब्रोकर म्हणून छोटी मोठी कामे करत होता. वंदना पुण्यात ऋषभ लखनऊमध्ये. एरवी तासनतास एकमेकांना वेळ देणाऱ्या या दोघात बोलणं कमी झालं. यामुळे ऋषभ मात्र सैरभैर झाला. वंदनावर संशय घेऊ लागला. तिचं बाहेर अफेअर तर नाही ना अशी भीती त्याला सतावू लागली. संशयाचे हे भूत दिवसेंदिवस वाढत गेलं आणि हृषभने टोकाचे पाऊल उचलण्याचं ठरवलं.

25 जानेवारीला तो पुण्यात आला. त्याने हिंजवडीतील ओयो हॉटेलमध्ये रूम घेतली. २६ जानेवारीला वंदना त्याला भेटायला आली. वेळ दोघांनी सोबत घालवला आणि ती लगेच परतली. २७ जानेवारीला वंदना परत आली. दोघांनी एकत्र शॉपिंग केली, दिवसभर दोघेही एकत्रच होते. रात्री परत हॉटेलमध्ये आले. दोघेही बेडवर असताना ऋषभने अचानक बंदूक काढली आणि पाच गोळ्या वंदनावर झाडल्या. डोक्यात गोळ्या लागल्याने वंदनाचा जागीच मृत्यू झाला.

नाकाबंदीमुळे आरोपी सापडला-

अतिशय थंड डोक्याने ऋषभने वंदनाचा खून केला. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो खोलीतून बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने निघून गेला. मुंबईत पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटलेल्या ऋषभची पोलिसांनी अंग झडती घेतली. तेव्हा त्यांना त्याच्या बॅगेत एक बंदूक सापडली. त्यानंतर ऋषभचं हे बिंग फुटलं. मुंबई पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. पोलिसांनी त्याला अटकही केली. केवळ डोक्यात संशयाचे भूत शिरल्याने ऋषभने प्रेयसी वंदनाचा खून केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhinjawadiहिंजवडीPoliceपोलिस