शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका शहर पोलीस दलाला बसला असून, शहरातील २७२ पोलीस अधिकारी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका शहर पोलीस दलाला बसला असून, शहरातील २७२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या उपचार करण्यात येत आहे. आजाराचा हा संसर्ग लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने कोविड सेलची नियुक्ती केली आहे. या सेलमध्ये सहायक पोलीस आयुक्त, एक निरीक्षक व ३ उपनिरीक्षक व अंमलदारांची नियुक्ती केली आहे. या सेलमार्फत पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे.

शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी १० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. तसेच आणखी ऑक्सिजन सिलिंडर अ‍ॅमेझॉन कंपनीकडूनही घेण्यात येत आहे.

बाधित अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय सर्वप्रथम शिवाजीनगर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले जाणार असून, त्यानंतर त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सिम्बायोसिस लवळे, जम्बो कोविड सेंटर, कमांड हॉस्पिटल येथे उपचार केले जाणार आहेत. पहिल्या कोविड लाटेच्यावेळी या हॉस्पिटलमध्ये पोलिसांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आले होते.

ज्या पोलिसांची घरे छोटी असून कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त आहे व ते बाधित आहेत, अशांसाठी होम आयसोलेशयनची सुविधा वेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.

शहर पोलीस दलातील १९८० जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून, त्यात ५२ जण बाधित आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले. तसेच पोलीस दलातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे १९८१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

या लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ठाणे स्तरावर मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, ऑक्सिमीटर, मास्क शिल्ड यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

बाधित झालेल्या पोलिसांना रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी पोलीस आयुकत अमिताभ गुप्ता यांनी स्वत: अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर रेमडसिविर इंजेक्शनचा १० टक्के वाटा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त गुप्ता हे स्वत: झुम मीटिंगद्वारे बाधितांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत व त्यांचे मनोबल वाढवित आहेत़

.......

२०५९ बाधित पोलीस

शहर पोलीस दलात पहिल्या पोलीस अंमलदारांना १६ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्ग झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ५९ पोलीस बाधित झाले आहेत. सध्या २७२ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर उपचार करण्यात येत आहे. या काळात १ पोलीस अधिकारी व १२ पोलीस अंमलदार यांचे निधन झाले आहे.

......

.......