शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सातारा महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटल्याने वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 9:53 AM

पलटी झालेला रिलायन्स कंपनीचा टँकर हा मुंबईकडून जयसिंगपूरकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी जीव धोक्यात घालून पलटी टँकर क्रेनच्या साहाय्याने सरळ केला.

ठळक मुद्देपुणे-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे येथे झाला अपघात पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याने इंधन रस्त्यावर सांडले अपघातामुळे महामार्गावर झाली वाहतूक कोंडी

सातारा : पुणे - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. टँकर उलटल्यानंतर पेट्रोल रस्त्याच्या कडेने वाहत असल्याने आग लागल्याची मोठी शक्यता होती.  या घटनेनंतर तिथे काही वेळ बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु पोलीस व अग्निशामक दल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रणात आली. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली. त्या वेळी या टॅकरमधील पेट्रोल रस्त्यावर पाण्यासारखे वाहताना दिसत होते. त्यामुळे काही अघटीत घडले तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. रस्ताजवळील सोसायट्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी नांदेड सिटी अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख सुजित पाटील यांनी सर्व परिस्थिती संभाळत चार क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या मागवल्या  होत्या. त्यामुळे वाहणारे पेट्रोल रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे करीत इंधन जमिनीमध्ये जिरवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच वाहणाऱ्या पेट्रोलवर माती टाकुन घसरडे रस्ते व्यवस्थित केले. वाहणाऱ्या इंधनावर फोरमचा फवाऱ्यांचा वापर केला. त्यामुळे कोठे ठिणगी  पडली तर आग पसरणार नाही यांची पुरेपूर काळजी अग्निशामक दल घेत होते. 

खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजही काही काळाकरिता बंद केली होती. टँकर उलटल्याने महामार्गावर काही काळाकरिता वाहतूक थांबविण्यात आल्याने वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ननवरे, बिट मार्शल महेंद्र राऊत, सुशांत यादव तसेच अग्निशामक दलाचे ओंकार इंगवले, भूषण देशमुख, अभिषेक गोणे, प्रसाद जिवडे, महेश गारमाळ, शरद माने ओंकार पाटील, महेंद्र देशमुख, अभिजित रांजणे, तेजस डांगरे आदी कर्मचाऱ्यांनी तसेच नऱ्हे येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुटे यांनी जीव धोक्यात घालून उलटलेला टँकर सरळ करून वाहतूक सुरळीत केली. 

पलटी झालेला रिलायन्स कंपनीचा टँकर हा मुंबईकडून जयसिंगपूरकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी जीव धोक्यात घालून पलटी टँकर क्रेनच्या साहाय्याने सरळ केला. मात्र रिलायन्स कंपनीच्या रेस्क्यू टीमला पहाटे कळवूनही ते सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहचल्याने टँकर वाहतुकीसाठी योग्य असल्याचे सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्याने महामार्गावर इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :PuneपुणेSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्गPetrolपेट्रोल