शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे ! पुण्यात अवघ्या एका महिन्यात झाली तब्बल तीन लाख मोबाईलची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 16:04 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना नवीन मोबाईल घेऊन देणे पालकांना भाग पडले.

ठळक मुद्देसात ते पंधरा हजारांपासून झाली खरेदीजिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती या भागात सर्वाधिक मोबाईल विक्री

तेजस टवलारकर- पिंपरी : पुणे जिल्ह्यात दरमहा सरासरी एक लाख वीस हजार मोबाईल विकले जातात. कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि शिकवणी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मेपासूनच मोबाईलची मागणी वाढली होती. जूनमध्ये जिल्ह्यात तीन लाखांवर मोबाईलची विक्री झाल्याची माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमोडे यांनी दिली.

सात ते पंधरा हजार रूपयांपर्यंतच्या मोबाईल खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती या भागात सर्वाधिक मोबाईल विक्री झाली आहे. पुणे जिल्ह्यात ४५०० मोबाईल विक्रेते आहेत. पुणे अणि पिंपरी-चिंचवड परिसरात शाळांची आणि खासगी शिकवणींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लॅपटॉप, कॉम्प्युटर विकत घेणे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे मोबाईलच्या मागणीत वाढ झाली आहे.

विक्रेत्यांनी सांगितले की, मार्च आणि मे महिन्यात लॉकडाऊन होते. मे महिन्यात काही प्रमाणात सुट देण्यात आली होती. मोबाईलची मागणी मेपासून सुरू झाली होती. परंतु, त्यावेळी ग्राहक संभ्रमात होते. जून महिन्यात मागणी सर्वाधिक वाढली होती.

कोरोनापूर्वी मुले मोबाईलच्या नादात अभ्यास करत नाहीत,अशी ओरड सर्वच स्तरातून होत असे. परंतु, मार्चपासून कोरोनाचे संकट सुरू झाले. तेव्हापासून शाळा आणि शिकवणी वर्ग बंद आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शाळा आणि शिकवणी सुरू आहेत. विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन देणे पालकांना भाग पडले. त्यामुळे मोबाईल विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

---जूननंतर ४० टक्क्यांनी मागणीत घटजूनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल विक्री झाली. मात्र, त्यानंतर साधारण ६० ते ७० हजार मोबाईल संपूर्ण पुणे जिल्ह्यात विकले जात आहेत. मे आणि जूनमध्येच मोबाईलला मागणी वाढली होती. आता ४० टकक्यांनी त्यात घट झाली आहे.

---

लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, मेपासून मोबाईलच्या खरेदीचे प्रमाण वाढत गेले. दरवर्षी जूनमध्ये सुरु होणारी शाळा-महाविद्यालये यंदा ऑनलाइन सुरु झाली आहेत. ऑनलाइनशिक्षणासाठी जूनमध्ये मोबाईल खरेदीचे प्रमाण दुप्पट वाढले आणि सर्वाधिक विक्री जूनमध्ये झाली.

- सुधीर वाघमोडे, पुणे जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनEducationशिक्षणStudentविद्यार्थीMobileमोबाइल