उत्सुकतेपोटी पुण्यातील बुधवार पेठ पाहण्यासाठी गेला अन् त्याला '२६ हजारांना' लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:05 IST2021-10-25T15:02:50+5:302021-10-25T15:05:52+5:30

पुण्यातील बुधवार पेठेतील दाणी आळीत असाच गावाहून आलेल्या गृहस्थाबाबत प्रसंग घडला. गावाकडून आलेल्या एकाला जबरदस्तीने मिठी मारुन त्याच्या खिशातील २६ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.

out of curiosity he came to see budhwar Peth in Pune and loss 26 thousand | उत्सुकतेपोटी पुण्यातील बुधवार पेठ पाहण्यासाठी गेला अन् त्याला '२६ हजारांना' लुटला

उत्सुकतेपोटी पुण्यातील बुधवार पेठ पाहण्यासाठी गेला अन् त्याला '२६ हजारांना' लुटला

पुणे : प्रत्येक शहरात काही ठिकाणी अशी असतात की त्या गल्ल्या बदनाम झालेल्या असतात. बाहेरुन शहरात येणाऱ्यांना अशा ठिकाणचे नाव माहिती असते. पण, त्यामुळे उत्सुकतेपोटी शहरात आल्यावर तेथे जातात. तेथील वातावरण पाहून कावरे बावरे होतात. अशा नव्या तरुणांना हेरुन लुबाडले जाते. पुण्यातील बुधवार पेठेतील दाणी आळीत असाच गावाहून आलेल्या गृहस्थाबाबत प्रसंग घडला. गावाकडून आलेल्या एकाला जबरदस्तीने मिठी मारुन त्याच्या खिशातील २६ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या गृहस्थाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धानोरा येथील राहणारे आहेत. ते शनिवारी दुपारी साडेतीन वाजता बुधवार पेठेतील दाणी आळीमधून पायी जात होते. तेथील नवी बिल्डिंगसमोर ते आले असताना आरोपी फिर्यादीच्या जवळ आले. त्यांनी गावाकडून आला आहे काय?, असे म्हणून त्यांचा हात पकडला. जबरदस्तीने मिठी मारुन फिर्यादीच्या पँटच्या खिशातील पाकीट व त्यामध्ये असलेले २६ हजार रुपये चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title: out of curiosity he came to see budhwar Peth in Pune and loss 26 thousand